‘हलाल’ पद्धतीवरून मनसेचा गंभीर दावा; नेमकं हलाल म्हणजे काय माहिती आहे का?
मटण म्हणलं की मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतो. मग तो तांबडा-पांढऱ्या रस्स्यासोबत असो किंवा सावजीसोबत. लोक मटण चवीने खातात. मात्र आता खाण्यावरून नवीन वादाला तोंड फुटू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हलालसंबंधी मोठं विधान करण्यात आलं आहे. हलाल मटनातून मिळणारा पैसा टेरर फंडींगसाठी करण्यात येतो, असा दावा मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्याकडून […]
ADVERTISEMENT
मटण म्हणलं की मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतो. मग तो तांबडा-पांढऱ्या रस्स्यासोबत असो किंवा सावजीसोबत. लोक मटण चवीने खातात. मात्र आता खाण्यावरून नवीन वादाला तोंड फुटू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हलालसंबंधी मोठं विधान करण्यात आलं आहे. हलाल मटनातून मिळणारा पैसा टेरर फंडींगसाठी करण्यात येतो, असा दावा मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आलला आहे.
ADVERTISEMENT
यापूर्वीही हलाल मटणावर घेण्यात आलं होतं आक्षेप
यापूर्वी देखील अनेकवेळा हलाल मटनाबाबत आक्षेप घेण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने खेळाडूंच्या डायटमध्ये हलाल मटणचं द्यावं, असं सांगितलं होतं. त्यामुळे मोठा वाद झाला होता. तर यापूर्वी कर्नाटक येथील भाजपचे महासचिव सीटी रवी यांनी हलाल मटण म्हणजे आर्थिक जिहाद असल्याचं म्हटलं होतं. हिंदुंनी हलाल मटण खाऊ नये असं आवाहनही रवी यांनी केलं होतं. हिंदुत्वादी संघटनांनी हलाल मटणाला पूर्वीपासून विरोध केला आहे.
अनेकवेळा उपस्थित होतोय ‘हलाल’वरुन वाद
हलाल ही पद्धत मुस्लिम धर्मीयांमध्ये आहे. एका विशिष्ट प्रकारे प्राण्याची कत्तल केली जाते. ज्याला इस्लाममध्ये योग्य असल्याचं म्हटलं जातं. तर ही पद्धत चुकीची असून यात प्राण्याला यातना होते, असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून झटका पद्धत समोर आली आहे. शीख समुदायात मागील काही वर्षांपासून झटका पद्धतीने कापण्यात आलेल्या प्राण्यांचं मटण खाल्लं जात आहे. तर काही हिंदुत्वादी संघटनांनी झटका पद्धतीनेच कापण्यात आलेल्या मटणाचं सेवन करावं, असं आवाहन केलं आहे.नेमकी ‘हलाल’ पद्धत म्हणजे काय?
हे वाचलं का?
नेमकी ‘हलाल’ पद्धत म्हणजे काय?
हलाल पद्धत म्हणजे प्राण्याला कापताना मात्र बळी देताना त्यांची थेट हत्या न करता, प्राण्यांच्या मानेची विशिष्ट शीर कापली जाते. ह्या प्रकारात प्राणी कापण्याआधी तब्येतीने ठणठणीत असणे त्याला कुठलाही आजार नसणे हे जास्त महत्वाचे मानले जाते. कापण्यापूर्वी प्राणी बेशुद्ध अवस्थेत नसायला पाहिजे. प्राणी कापताना दुसऱ्या प्राण्याने पाहू नये म्हणून एका वेळेस एकच प्राणी कापला जातो. ज्यात बिस्मिल्लाह, अल्लाहू अकबर म्हणून श्वसनलिकेपासून कापायला सुरुवात केली जाते. सर्व रक्त वाहून गेल्यानंतर मग कापण्याची पुढील प्रक्रिया केली जाते. याला इस्लाममध्ये हलाल पद्धत मानली जाते.
झटका पद्धत
हलाल पद्धतमध्ये ज्यापद्धतीने प्राण्याला कापले जाते त्यात तो तडफडून मरतो. त्याचा जीव जायला वेळ लागतो. त्यापद्धतीमुळे प्राण्यांना यातना सहन कराव्या लागतात, असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे प्राण्याचा बळी देताना झटका पद्धत योग्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. झटका पद्धतीत प्राण्याला कळण्याआदी तलवार किंवा धारधार शास्त्राने त्याच शीर धडापासून वेगळं केलं जातं. किंवा विद्युत झटक्याची पद्धत देखील प्रचलित होऊ लागली आहे. झटका पद्धतीमुळे प्राण्याला त्रास होत नाही. त्याला कळायच्या आदी त्याचा जीव जातो, म्हणून ही पद्धत योग्य आहे, असं काहींचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
हलाल पद्धतीने कापण्यात आलेल्या मटणाला विदेशात मागणी
बहुसंख्याक मुस्लिम राष्ट्रात हलाल मीट म्हणजे मटणाची मागणी आहे. अनेक देश आम्ही हलाल मटण एक्स्पोर्ट करतो असं सांगतात. आज भारतासह इतर देशात देखील हॉटेलमध्ये किंवा मटनशॉपमध्ये गेल्यास आमच्या फक्त हलाल मटण मिळेल अशा जाहिराती केल्या जातात. आता झटका पद्धतीच्या देखील जाहिराती होऊ लागल्या आहेत. तर हलाल मीट मिळण्याचे अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जातात.
ADVERTISEMENT
मुस्लिम समाजातील लोक हलाल मटणाला प्राधान्य देतात, मात्र आता हलाल पद्धतीने कापण्यात आलेलं मटण आमच्यावर लादलं जात आहे. अल्लाहला अर्पण केलेलं उष्ट मटण आम्हाला खाऊ घातलं जात आहे, त्यामुळे झटका पद्धतीचंच मटण खावं, असं आवाहन काही हिंदुत्वादी संघटनांनी केलं आहे. काहींनी तर याला आर्थिक जिहाद असं म्हटलं आहे तर आता मनसेने हलाल मटणमधून मिळणारा पैसा टेरर फंडिंग म्हणजे दहशतवादी कृतीसाठी लावला जातो असा दावा केला आहे. आता हा हलाल आणि झटका वाद कुठं जाऊन थांबतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT