संदीप देशपांडेंचं उद्धव ठाकरेंना पत्र : आम्हाला सहानभूती कधी मिळणार? विचारला सवाल
मनसे सरचिटणीस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपला शिंदे गटाची साथ आहे तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी मदत करत आहेत. अशात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधला […]
ADVERTISEMENT

मनसे सरचिटणीस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपला शिंदे गटाची साथ आहे तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी मदत करत आहेत. अशात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
नेमकं काय म्हटलंय पत्रात?
तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती, ठीक आहे. पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? असं संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? कोरोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची? महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिल त्याची सहानभूती पाहिजे की की लोकांचे करोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पबना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे?, असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला.
करोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सनी बिलामध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? रेल्वेमध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानभूती पाहिजे? करोनामध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं त्याची सहानभूती पाहिजे की शिवभोजनच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानभूती पाहिजे?