महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आता विशेष लसीकरण मोहीम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे. ही मोहीम 2 नोव्हेंबरला संपणार आहे. 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस या मोहिमेदरम्यान दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या खासकरून महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलांचं लसीकरण तातडीने होणं गरजेचं आहे त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर हा असा वयोगट आहे जो जास्त काळ प्रवास करतो. त्यामुळेही त्याचं लसीकरण होणं आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महाविद्यालयं 20 तारखेपासून सुरू झाली आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना लसीकरणात सहभागी करून घेणं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्रीही आग्रही आहेत. त्यामुळेच ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आता सुधारू लागली आहे त्यामुळेच 20 तारखेपासून महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये ही मोहीम सुरू केली गेली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT