शिवसेनेतल्या बंडामुळे सत्ता उद्धव ठाकरेंची गेली… मात्र सुप्रिया सुळेंचं टेन्शन का वाढलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत २१ जूनला बंड झालं. त्यानंतर राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे गटाची आणि उद्धव ठाकरे गटाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली. या प्रकरणी बुधवारी सुनावणी होती. त्या दरम्यान परिस्थिती आहे तशी ठेवत पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. मात्र शिवसेना दुभंगली आहे हे सांगायला कुणाही ज्योतिषाची गरज नाही. या सगळ्या लढाईत सर्वात जास्त नुकसान झालं आहे ते उद्धव ठाकरे यांचं. उद्धव ठाकरे यांची फक्त सत्ता गेली नाही तर शिवसेनाही हातातून जाण्याची भीती आहे. मात्र या सगळ्यात सुप्रिया सुळे यांचं टेन्शन वाढलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तर गेलंच पण आता शिवसेना हा पक्षही त्यांच्या हातून जाण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही टेन्शन वाढलं आहे. राजकीय समीकरणंच आता अशी तयार झाली आहे की त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

उद्धव ठाकरे यांची फक्त सत्ता गेली नाही तर शिवसेनाही हातातून जाण्याची भीती

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तर गेलंच पण आता शिवसेना हा पक्षही त्यांच्या हातून जाण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही टेन्शन वाढलं आहे. राजकीय समीकरणंच आता अशी तयार झाली आहे की त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे यांचं टेन्शन नेमकं का वाढलं आहे?

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांनी जेव्हा बारामतीतून निवडणूक जिंकली तेव्हा त्या ५० हजार मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपच्या कांचन कौल त्यांच्या विरोधात होत्या त्यांना सुमारे १ लाख मतांनी सुप्रिया सुळे यांनी हरवलं. त्यावेळी सर्वाधिक मतं सुप्रिया सुळे यांना बारामती शहरातून आली होती. त्यानंतर पुरंदर, इंदापूर आणि भोर या ठिकाणाहूनही चांगली मतं सुप्रिया सुळेंना मिळाली होती. मात्र दौंड आणि खडकवासला या ठिकाणी त्या पिछाडीवर होत्या.

२०१९ नंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. इंदापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा होता अशी चर्चा होती. मात्र आता ते भाजपमध्ये गेले आहेत. तसंच पुरंदर भागातले विजय शिवतारे यांनीही एकनाथ शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव संजय जगताप यांनी केला होता. मात्र विजय शिवतारे हे पवार कुटुंबीयांचे विरोधक मानले जातात. पुरंदरमध्ये पवारांच्या कुटुंबीयांची ताकद काहीशी कमी पडल्याची चर्चा काही वर्षांपासून रंगली आहे. एवढंच नाही तर विजय शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे मानले जातात. त्यामुळे पुरंदरवर जास्त लक्ष दिलं जाईल. दौंडच्या जागेवरही सुप्रिया सुळेंची पकड कमकुवत झाली आहे याचा फायदा भाजप घेईल यात शंकाच नाही. २०१४ तसंच २०१९ ला राहुल कुल इथून निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राहुल कुल हे मंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दौंडमध्ये घट्ट पाय रोवतील यात शंकाच नाही.

ADVERTISEMENT

भोरच्या जागेची समीकरणंही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जातील ही चिन्हं आहेत. मागच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी नगण्य आघाडी सुप्रिया सुळेंना मिळाली होती. जी आघाडी मिळाली ती देखील काँग्रेसच्या संग्राम थोपटेंमुळे मिळाली याही चर्चा होत्या. अशात आता संग्राम थोपटे हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. २०२० नंतर संग्राम थोपटे राष्ट्रवादीवर नाराज आहेत असं बोललं जातं आहे. नाना पटोलेंनी जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेसमधून अध्यक्षपदासाठी आघाडीवर नाव होतं ते संग्राम थोपटे यांचंच. मात्र शरद पवारांमुळे त्यांच्या हातून ही संधी गेली आणि ते नाराज झाले.

ADVERTISEMENT

ही सगळी समीकरणं बदलेली असताना सुप्रिया सुळेंसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते बारामती मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवणं. सुप्रिया सुळेंना ज्यांचा पाठिंबा मिळत होता त्यातलं कुणी नाराज आहे तर कुणी भाजपमध्ये गेलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुप्रिया सुळे यांचं टेन्शन वाढलंय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी A म्हणजे अमेठी आणि B म्हणजे बारामती असं म्हणत टीका केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप बारामतीत मोठा खेळ करण्याच्या तयारी करतो आहे हे उघड आहे. आता या सगळ्या आव्हानांना सुप्रिया सुळे कसं तोंड देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT