‘मला चुलत्याची (शरद पवार) सवय लागली, आता काय करू?’; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची ‘झोप’च काढली

मुंबई तक

‘मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची कामं करतो’, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला होता. एकनाथ शिंदे यांच्या विधानावर बोट ठेवत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर मिश्किल भाष्य करत टोलेबाजी केली. पाचोरा येथे आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना झोपता कधी? असा प्रश्न केला. त्याचबरोबर सकाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

‘मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची कामं करतो’, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला होता. एकनाथ शिंदे यांच्या विधानावर बोट ठेवत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर मिश्किल भाष्य करत टोलेबाजी केली.

पाचोरा येथे आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना झोपता कधी? असा प्रश्न केला. त्याचबरोबर सकाळी उठून काम करण्याची सवय मला शरद पवारांमुळे लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री कोणताही विषय तिसरीकडेच घेऊन जातात. परवाच पैठणचं भाषण ऐकलं. मला वाटलं मुख्यमंत्री आता काय सांगतील. तर सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील… मी सहा वाजेपर्यंत काम करतो. अरे मग सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो, तर हा बाबा उठतो कधी?’

सुप्रिया सुळेंचं विधान, अजित पवारांनी शिंदेंवर झोपेवरून साधला निशाणा

‘माझी बहीण (सुप्रिया सुळे) म्हणाली, माझा दादा (अजित पवार ) सकाळी उठून सहा वाजता कामाला लागतो. आता आहे मला सवय. चुलत्याची (शरद पवार) सवय लागली तर काय करू? वाईट तर नाहीये ना सकाळी उठून काम करणं? त्यावर हे (एकनाथ शिंदे) म्हणाले की, मी सहापर्यंत काम करतो. मग झोपता कधी?’