महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो सोमय्यांनी आणला समोर
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar)यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त करण्यात आली. यावेळी हे संपूर्ण प्रकरण मनी लाँड्रिंगचं असून त्यात पुष्पक ग्रुप आणि त्याचे महेश पटेल (Mahesh Patel) आणि चंद्रकांत पटेल (Chandrakant Patel) यांचं नाव आता समोर आलं आहे. याच पुष्पक ग्रुपच्या पुष्पक बुलियनच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar)यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त करण्यात आली. यावेळी हे संपूर्ण प्रकरण मनी लाँड्रिंगचं असून त्यात पुष्पक ग्रुप आणि त्याचे महेश पटेल (Mahesh Patel) आणि चंद्रकांत पटेल (Chandrakant Patel) यांचं नाव आता समोर आलं आहे. याच पुष्पक ग्रुपच्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून पाटणकरांच्या कंपनीला पैसे फिरविण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान, पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोस्ट करुन याबाबत सवाल उपस्थित केले आहेत.
श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला जे पैसे पुरविण्यात आले होते. त्याचबाबत चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं आहे. याच चंद्रकांत पटेल यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आता किरीट सोमय्यांनी पोस्ट करुन याबाबत सवाल उपस्थित केला आहे.
पाहा किरीट सोमय्यांनी यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे:
‘श्रीधर पाटणकर मनी लाँडरिंगचे पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल श्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत?’ असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.









