Maharashtra Rain: गारपिटीचं संकट! पुण्यासह चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!
Rain news in maharashtra today marathi : भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून 15 ते 18 या कालावधीतील हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 16 मार्च रोजीसाठी पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर राज्यात सर्वदूर गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (maharashtra weather […]
ADVERTISEMENT
Rain news in maharashtra today marathi : भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून 15 ते 18 या कालावधीतील हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 16 मार्च रोजीसाठी पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर राज्यात सर्वदूर गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (maharashtra weather update)
ADVERTISEMENT
अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतमालाचं प्रचंड नुकसान झालेलं असतानाच पुन्हा एकदा अवकाळीसह गारपिटीचं संकट घोंगावू लागलं आहे. महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसासह वाऱ्याचा वेगही वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
15 मार्च हवामान अंदाज : विजांच्या कडकटासह पावसाचा अंदाज
राज्यातील मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
16 मार्च हवामान अंदाज : पुण्यासह चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16 मार्च (गुरुवार) रोजी राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
त्याचबरोबर मुंबईपासून ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबारपर्यंत पावसाचा अंदाज असून, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांना वगळून इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
17 मार्च हवामान अंदाज : अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता
17 मार्च रोजीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज असून, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात हवामान सामन्य राहणार असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
14 मार्च: महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाशी, संबंधित सोसाट्याचा वारा येण्यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे.
काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.
खालील चेतावणी 15-18 मार्च पर्यंत आहेत. आज महाराष्ट्रासाठीही TS इशारा देण्यात आला आहे— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2023
18 मार्च हवामान अंदाज : विदर्भाला झोडपणार
शनिवारी (15 मार्च) विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT