महाराष्ट्रात दिवसभरात 44 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज, 555 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 44 हजार 493 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 50 लाख 70 हजार 801 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.71 टक्के इतके झाले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये हे प्रमाण 81 टक्क्यांपर्यंत घसरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दिवसभरात 555 मृत्यूंची नोंद झाली […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 44 हजार 493 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 50 लाख 70 हजार 801 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.71 टक्के इतके झाले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये हे प्रमाण 81 टक्क्यांपर्यंत घसरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दिवसभरात 555 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 1.57 आहे.
महाराष्ट्रात 27 लाख 94 हजार 457 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 20 हजार 946 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 3 लाख 67 हजार 457 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 86 हजार 618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात 29 हजार 644 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद जाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 55 लाख 27 हजार 92 इतकी झाली आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर करतेय कोरोना रूग्णांची मदत; ‘त्या’ घटनेनंतर घेतला निर्णय
आज नोंद झालेल्या 555 मृत्यूंपैकी 369 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 186 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील 708 मृत्यू पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूसंख्येत करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यू संख्या 708 ने वाढली आहे.