महाराष्ट्रात गंभीर स्थिती; गेल्या 24 तासात 249 जणांचा मृत्यू, 43 हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण
मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासातील राज्यातील आकडा हा हादरवून टाकणारा आहे. कारण राज्यात आज एका दिवसात तब्बल 43,183 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा प्रचंड वाढत […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासातील राज्यातील आकडा हा हादरवून टाकणारा आहे. कारण राज्यात आज एका दिवसात तब्बल 43,183 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा प्रचंड वाढत आहे.
दरम्यान, राज्यात आज 32,641 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 24,33,368 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.2 टक्के एवढे झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 249 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.92 टक्के एवढा आहे.
मुंबईत Corona चा कहर दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,99,75,341 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28,56,163 (14.30 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19,09,498 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 18,432 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 3,66,533 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.









