Maharashtra Corona Cases: दिवसभरात किती रुग्ण सापडले, महाराष्ट्रातील कोरोनाची नेमकी स्थिती काय?
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8296 नवे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही म्हणावी त्या प्रमाणात नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता अद्यापही कायम आहे. त्यातच नवनवे व्हेरिएंट सापडत असल्याने अधिक धास्ती वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,25,528 जणांचे कोरोनाने प्राण […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8296 नवे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही म्हणावी त्या प्रमाणात नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता अद्यापही कायम आहे. त्यातच नवनवे व्हेरिएंट सापडत असल्याने अधिक धास्ती वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,25,528 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.
गेल्या 24 तासात राज्यात 8296 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात 10 जुलै रोजी 6,026 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 59,06,466 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.05 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 179 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,38,00,139 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,49,264 (14.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,85,580 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,737 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,14,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.










