Maharashtra Corona Cases: महाराष्ट्राचं टेन्शन कायम, कोरोनाचे रुग्ण काही कमी होईना!
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)9489 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्याभरापासून महाराष्ट्रात दररोज जवळजवळ 10 हजारांच्या आसपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं टेन्शन कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 153 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,22,724 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 9,489 नवे पॉझिटिव्ह रुग्ण […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)9489 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्याभरापासून महाराष्ट्रात दररोज जवळजवळ 10 हजारांच्या आसपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं टेन्शन कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 153 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,22,724 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.
गेल्या 24 तासात राज्यात 9,489 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 575 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज (3 जुलै) 8,562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 58,45,315 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 153 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.1 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,17,575 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.