Maharashtra SSC Result 2021: अखेर 10 वीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के
पुणे: Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेच्या निकाल 16 जुलै 2021 जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra SSC result 2021) यंदाच्या निकालाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपलं निकाल पत्र हाती मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. […]
ADVERTISEMENT

पुणे: Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेच्या निकाल 16 जुलै 2021 जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra SSC result 2021) यंदाच्या निकालाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपलं निकाल पत्र हाती मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या जोरावर मुलांना यंदा दहावीचे गुण देण्यात आले आहेत.
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यंदाचा निकाल लावण्यात आला आहे. बोर्डाने नुकतीच या निकालांची घोषणा केलेली आहे. यावेळी राज्यात दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत त्यांचं पास होण्याचं प्रमाण अधिक आहे. राज्यात ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
राज्यात मुलींचा निकाल हा ९९.९६ टक्के लागला असून मुलांचा निकाल हा ९९.९४ टक्के इतका लागला आहे अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
SSC Result 2020: विभागानुसार निकाल










