Chandrakant Patil: “महात्मा गांधी देश फिरले, उद्धव ठाकरेंना वाटतं मातोश्रीत राहूनच..”
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने विरोधक सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचे नेते करत आहते. अशात आता चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने विरोधक सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचे नेते करत आहते. अशात आता चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे चंद्रकांत पाटील यांनी?
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथील दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. दोन विरोधी पक्षनेते असतात ते बऱ्याचदा विचारांच्या आधारे विरोधी असतात असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. तसंच पुढे ते म्हणाले की देशात महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले. कारण ते देश फिरले. सर्वसामान्यांशी महात्मा गांधींनी संवाद साधला. मात्र उद्धव ठाकरेंना मातोश्रीमध्ये राहूनच लोकांची दुःखं खलतात. आता यांना साक्षात्कार झाला असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
ज्या गोष्टी आपण सत्तेत असताना केल्या नाहीत त्याची आठवण असली पाहिजे. विरोधी पक्षाची दखल सत्ताधारी पक्ष घेत असतो त्यामुळे ती आम्हीही घेऊ. लोकशाहीत इच्छा व्यक्त केली तर त्यात काहीही गैर नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray and Aditya Thackeray) हे आत्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे. पण त्यांना उशिरा कळाले की, लोकांची दुःख कळण्यासाठी फिल्डवर जावे लागते. असे देखील यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
एअरबस प्रकल्प गुजरातला गेला त्याविषयी काय म्हणाले चंद्रकांतदादा?
फॉक्सकॉनच्या पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. याबाबत विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. याच विषयी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की मला बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून समजतात. तुमच्याकडूनच ही बाब मला आत्ता कळली आहे. याबाबत मी माहिती घेतो आणि बोलतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT