Rajesh Sapte Suicide : मुख्य आरोपी राकेश मौर्याला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी राकेश मौर्याला अटक केली आहे. पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना राकेश मौर्याला वाकड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आपल्या राहत्या घरी ३ जुलै रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत साप्ते यांनी आपल्या आत्महत्येला राकेश मौर्या जबाबदार असल्याचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटकही केली. परंतू मुख्य आरोपी मौर्या अजुनही पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

पिंपरी-चिंचवड पोलिसांचं एक पथक राकेश मौर्याच्या मागावर होतं. अशातच मौर्या शहराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर त्याला मुंबईतून गुरुवारी संध्याकाळी सात वाजता अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर राकेश मौर्याला आकुर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

हे वाचलं का?

राकेश मौर्या आपल्या कामांमध्ये अडचण आणत असून लेबर न देणं, धमकी देणं, व्यवसायात नुकसान करणं अशा अनेक प्रकारे मौर्या आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार साप्ते यांनी आपल्या अखेरच्या व्हिडीओत सांगितली होती. साप्ते यांच्या पत्नी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी मौर्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT