मुंबई: एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली, 85 प्रवासी असलेल्या विमानाच्या समोरच ट्रॅक्टरला आग

मुंबई तक

मुंबई: मुंबई विमानतळावर सोमवारी (10 जानेवारी) एक मोठा अपघात टळला आहे. एअर इंडियाच्या विमान AIC-647 मुंबई-जामनगर या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला विमानतळावर अचानक आग लागली. त्यावेळी विमानात 85 प्रवासी होते. ट्रॅक्टरला आग लागल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता. मात्र, विमानतळ प्रशासनाने तत्परता दाखवत ही आग तात्काळ विझवली. V26R स्टँडवर हा अपघात झाला. सुदैवाने यावेळी विमानाचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: मुंबई विमानतळावर सोमवारी (10 जानेवारी) एक मोठा अपघात टळला आहे. एअर इंडियाच्या विमान AIC-647 मुंबई-जामनगर या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला विमानतळावर अचानक आग लागली. त्यावेळी विमानात 85 प्रवासी होते. ट्रॅक्टरला आग लागल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता.

मात्र, विमानतळ प्रशासनाने तत्परता दाखवत ही आग तात्काळ विझवली. V26R स्टँडवर हा अपघात झाला. सुदैवाने यावेळी विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, या आगीच्या घटनेमुळे विमान उड्डाणास बराच उशीर झाला. अखेर 12.04 वाजता विमानाने उड्डाण केलं.

एअर इंडियाच्या फ्लाइटच्या गाडीला अचानक आग लागण्याचं कारण अद्याप तरी समजू शकलेलं नाही. पण या सगळ्या प्रकारामुळे विमानतळ प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले. मात्र, वेळीच आग अटोक्यात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानाला पुशबॅक करणारं हे वाहन ट्रॅक्टर असल्याचे समजतं आहे. एअर इंडियाच्या या विमानाला पुशबॅक करण्यासाठी हा ट्रॅक्टर आणण्यात आला होता. हा ट्रॅक्टर विमानाच्या अगदी जवळच उभा होता. पण अचानक या टॅक्टरने पेट घेतला. ऐनवेळी इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.