vijay mallya property : हुश्श! अखेर किंगफिशर हाऊस विकलं; हैदराबादच्या कंपनीनं मोजले कोट्यवधी
हुश्श!!! विकलं एकदाचं असे उद्गार किंगफिशर हाऊस विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या कर्ज वसुली न्यायाधिकरण अर्थात Debts Recovery Tribunals च्या अधिकाऱ्यांच्या तोंडून पडले असतील. २०१६ पासून तब्बल आठ वेळा लिलाव करूनही किंगफिशर एअरलाईन्सला गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. अखेर नवव्या प्रयत्नात न्यायाधिकरणाला यश आलं. बँकांचं कर्ज बुडवून परदेशी भरार झालेल्या विजय मल्ल्याची संपत्ती विकून सध्या वसुली केली जात आहे. […]
ADVERTISEMENT

हुश्श!!! विकलं एकदाचं असे उद्गार किंगफिशर हाऊस विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या कर्ज वसुली न्यायाधिकरण अर्थात Debts Recovery Tribunals च्या अधिकाऱ्यांच्या तोंडून पडले असतील. २०१६ पासून तब्बल आठ वेळा लिलाव करूनही किंगफिशर एअरलाईन्सला गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. अखेर नवव्या प्रयत्नात न्यायाधिकरणाला यश आलं.
बँकांचं कर्ज बुडवून परदेशी भरार झालेल्या विजय मल्ल्याची संपत्ती विकून सध्या वसुली केली जात आहे. तीन कंपन्यांतील मल्ल्याचे समभाग विकून वसुली केल्यानंतर आता किंगफिशर एअरलाईन्सच्या किंगफिशर हाऊसचीही विक्री करण्यात आली आहे. बंद पडलेलं हे कार्यालय हैदराबादमधील कंपनीनं खरेदी केलं आहे.
कर्जाच्या ओझ्याने बुडलेल्या आणि नंतर बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचं मुख्य कार्यालय असलेल्या किंगफिशर हाऊसची विक्री करण्यात आली आहे. हैदराबाद येथील प्रायवेट डेव्हलपर्स सैटर्न रियल्टर्स या कपंनीनं किंगफिशर हाऊस खरेदी केलं. ५२ कोटी रुपयांना किंगफिशर हाऊस विकलं गेलं असून, कर्ज वसुली न्यायाधिकरण अर्थात Debts Recovery Tribunals कडून ही विक्री करण्यात आली आहे.