भवानीपूरचा गड ‘ममतां’कडेच! भाजप उमेदवाराचा ५८ हजार मतांनी केला पराभव
विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत […]
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचल्या. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेला भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजपा उमेदवाराचा तब्बल ५८ हजार मतांनी पराभव करत ममतांनी विधानसभेत प्रवेश मिळवला.
भवानीपूर विधानसभा मतदारसंघ हा ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, यावेळी झालेल्या विधानसभा निवडुकीत त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मुख्यमंत्री झाल्यानं ममतांना विधानसभेचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं होतं.
काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघाऐवजी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ममतांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभूत झाल्यानंतर ममतांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत विधानसभेचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक होतं.