डोक्यात घातला हातोडा, पत्नीने जागेवरच जीव सोडला; नागपूरमध्ये खळबळ
Nagpur News, Crime News : महिला दिनी नागपूरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली. पतीने पत्नीची डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. हातोडा डोक्यात लागल्याने पत्नीने रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडला. (Man killed his wife in nagpur) 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनी नागपुरात नारी शक्ती, स्त्री शक्तीचा उदो उदो सुरू असतानाच एक भयंकर […]
ADVERTISEMENT
Nagpur News, Crime News : महिला दिनी नागपूरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली. पतीने पत्नीची डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. हातोडा डोक्यात लागल्याने पत्नीने रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडला. (Man killed his wife in nagpur)
ADVERTISEMENT
8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनी नागपुरात नारी शक्ती, स्त्री शक्तीचा उदो उदो सुरू असतानाच एक भयंकर घटना घडली. घरी आलेल्या युवकावरून पती-पत्नीमध्ये टोकाचा वाद झाला आणि त्यातूनच पतीने पत्नीचा जीवच घेतला.
नागपूरच्या कळंमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमाता नगरात अमर व लतिका भारद्वाज हे दाम्पत्य काही काळापासून वास्तव्याला होते. अमर भाजी ठेला चालवतो, तर मृत लतिका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. दोघांनाही दोन मुली असून, अमर हा संशय स्वभावाचा आहे.
हे वाचलं का?
तब्बल 13 महिलांवर बलात्कार करणारा वासनांध तुरुंगातून सुटला!
Nagpur Crime News : युवक घरी आला आणि वाद सुरू झाला…
अमर ललितावर नेहमी संशय घ्यायचा. त्यावरून अनेकदा त्यांच्यात वादही व्हायचे. काही वेळा तर वाद प्रचंड विकोपाला गेले होते. सततचे वाद आणि उडणारे खटके यामुळे दोघांनीही एकाच घरात वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही घरात वेगवेगळे राहायला लागले, मात्र, अमरची पत्नीवर नजर असायची. दरम्यान, काही कामानिमित्त एक युवक लतिकाच्या घरी आला.
ADVERTISEMENT
युवक घरी आल्यानंतर अमरने त्याला विरोध केला. यावरून अमरचा आणि लतिकाचा वाद झाला. दोघांमध्ये युवक घरी येण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला गेला आणि घडू नये तेच घडलं.
ADVERTISEMENT
Nagpur : भयंकर! अल्पवयीन मुलीने youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन्…
वाद वाढल्यानंतर राग अनावर झालेल्या अमरने लतिकाला घरात बोलवून घेतलं. त्यानंतर तिच्यासोबत कडाक्याचे भांडण केले. भांडण सुरू असतानाच अमरने घरात असलेल्या हातोडाच तिच्या डोक्यावर मारला. त्याने लतिकाच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, हे वार इतक्या जोराने केले की लतिका त्यात गंभीर जखमी झाली.
गंभीर जखमी झालेल्या लतिकाने घरातच जीव सोडला. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.
Crime : माहेरी आलेल्या प्रेयसीला घरी बोलावलं अन्… प्रियकराच्या कृतीने सातारा हादरलं
आई गमावली, बापही तुरूंगात; मुलींना एकटं राहण्याची वेळ
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमर संशयातून केलेल्या कृत्याने त्यांच्या मुलींना एकट्यानं राहण्याची वेळ आली आहे. आई कायमची गेली आणि अमरही पोलीस कोठडीत आहे. वडिलांना देखील कारावास होण्याची शक्यता असल्याने मुलींबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT