Family Man 3 : “फॅमिली के साथ आ रहा हूँ…;” मनोज वाजपेयीकडून सरप्राईज
Manoj Bajpayee | The Family Man 3 : हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दमदार अभिनेत्यांबद्दल बोलायचं झाल्यास यात मनोज वाजपेयीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. मनोज वायपेयीने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आणि यापैकीच एक सर्वोत्कृष्ट वेब सिरीज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. (Manoj Bajpayee led The Family Man 3’s release date is finally […]
ADVERTISEMENT
Manoj Bajpayee | The Family Man 3 :
ADVERTISEMENT
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दमदार अभिनेत्यांबद्दल बोलायचं झाल्यास यात मनोज वाजपेयीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. मनोज वायपेयीने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आणि यापैकीच एक सर्वोत्कृष्ट वेब सिरीज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. (Manoj Bajpayee led The Family Man 3’s release date is finally out)
फॅमिली मॅनचा पहिला आणि दुसरा सीझन सुपर-डूपर हिट ठरला होता. त्यानंतर चाहते या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनची वाट बघतं होते. आता याबाबत मनोज वाजपेयीने एक व्हीडिओ शेअर करुन माहिती दिली आहे. “Family” ke saath aa raha hoon…swagat nahin karoge humara?, असं कॅप्शन या व्हीडिओला दिलं आहे. मनोज वाजपेयींच्या या लेटेस्ट व्हीडिओने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.
हे वाचलं का?
व्हीडिओमध्ये काय आहे?
‘खूप दिवस झाले ना?, माझं लक्षपूर्वक ऐका, या होळीला मी तुमच्या फॅमिलीसाठी येतोय, माझ्या फॅमिलीला घेऊन. तयार रहा.
ADVERTISEMENT
होळीला येणार तिसरा सीझन?
अवघ्या १८ सेकंदाच्या या व्हीडिओमधून मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली का? या चर्चांना सुरुवात झाली आहे. हा बहुप्रतिक्षीत तिसरा सीझन या होळीला प्रदर्शित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
ADVERTISEMENT
याआधी, ‘द फॅमिली मॅन’चे दोन्ही सीझन Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही सीझनमध्ये मनोज वायपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. हे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले होते. मनोज वायपेयीची ‘श्रीकांत तिवारी’ ही भूमिका चाहत्यांना भावली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT