Kolhapur Flood: कोल्हापूरमधील ‘हे’ रस्ते आहेत बंद, प्रवास करण्याआधी ही यादी जरुर पाहा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पुराचं पाणी शहरी भागासह महामार्गांवर देखील शिरलं आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील अनेक महत्त्वाचे रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. ज्यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते आणि महामार्ग हे अद्याप बंदच ठेवण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

कोल्हापूरमध्ये अद्यापही पंचगंगा नदीचं पाणी हे धोक्याच्या पातळीहून बरंचच वर आहे. त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी 5 ते 6 फूट पाणी असल्याने अनेक वाहनं आणि अत्यावश्यक सेवा पुरविणारे ट्रक आणि गाड्या या कोल्हापूरच्या वेशीवरच अडकून पडल्या आहेत.

मागील दोन दिवसांपासून या सर्व गाड्यांच्या रांगा महामार्गावर पाहायला मिळत आहे. रविवारी देखील जीसीबीच्या अंदाजाने महामार्गावरील पाणी कमी झालेलं आहे की नाही याचा अंदाज घेतला गेला आहे. मात्र अद्यापही पाणी कायम असल्याने कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे

हे वाचलं का?

दरम्यान, कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी आणि कोल्हापूरवरुन येण्यासाठी जे काही मार्ग आहेत ते सध्या तरी बंदच आहेत.

पाहा कोल्हापूरमधील पुरामुळे कोणकोणते रस्ते आहेत बंद:

ADVERTISEMENT

  • कोल्हापूर ते रत्नागिरी – मलकापूर मार्ग

ADVERTISEMENT

  • कोल्हापूर ते पुणे (NH-4)

  • कोल्हापूर ते सांगली

  • कोल्हापूर ते सिंधुदुर्ग/गोवा

  • कोल्हापूर त बेळगाव (NH-4)

  • ही माहिती कोल्हापूर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. त्यामुळे जर आपल्याला या मार्गावरुन प्रवास करायचा असेल तर काही काळ थांबणं हे क्रमपाप्त आहे.

    दरम्यान, कोल्हापूर जिल्हयात NDRFच्या 6 तुकडया दाखल झाल्या असून बचाव कार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यावेळी भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 366 गावांना पुराचा फटका बसला असून यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे या पुरामुळे जिल्हयातील महावितरणची 10 उपकेंद्रे पूर्णत: बंद झाली आहेत.

    Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती नेमकी कशी?

    कोल्हापूरमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राधानगरी धरणासह नजीकची अनेक धरणं तुडुंब भरली आहेत. ज्याचं पाणी हे थेट पंचगंगा नदीमध्ये सोडलं जात आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरामधील पुराचं पाणी हे अद्यापही कमी होत नाही. दरम्यान, आता काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली असल्याने पंचगंगा नदीची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील काही तासात पाणी ओसरुन वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT