लाइव्ह

Marathi News Live Update : अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांसह फडणवीसांचे कौतुक, लोकायुक्त कायदा मंजूर

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:41 PM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : सातारा लोकसभा मतदारसंघ शिंदे गटासाठी पोषक वातावरण, शिवसेना उमेदवारी लढवणार

    सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक पद हे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांना देण्यात आले आहे. त्यानुसार 5 विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या माध्यमातून लोकसभा उमेदवारी बाबत मागणी केली जात असून याविषयी शिवसेनेकडून उमेदवारी लढवणार असल्याचे मत शरद कणसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे.
  • 08:30 PM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांसहा फडणवीसांचे कौतुक, लोकायुक्त कायदा मंजूर

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा मंजूर करण्यासाठी वेळोवेळी मागणी केली होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनंही करण्यात आली होती, मात्र आज हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत लोकायुक्त कायदा मंजूर झाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे येणाऱ्या काळात हा कायदा किती शक्तिशाली आहे हे कळेल असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
  • 05:13 PM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणेंचा निषेध

    सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या शालिमार येथील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. आज अधिवेशनात नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केले. यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
  • 04:30 PM • 15 Dec 2023

    Mla Disqaulification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांना दिलासा!

    राहुल नार्वेकर यांची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता यांनी आमदार अपात्रतेच्या निकालासंबंधित सुप्रीम कोर्टात तीन आठवडे म्हणजेच २१ जानेवारीपर्यंतचा वेळ मागितला होता. मात्र, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. पण आता सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. यामुळे नार्वेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.
  • ADVERTISEMENT

  • 03:53 PM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी शासकीय सुटी जाहीर करा- प्रताप सरनाईक

    यंदा नवीन वर्षात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे.
  • 02:29 PM • 15 Dec 2023

    Mla Disqaulification : ठाकरेंना झटका, नार्वेकरांना दिलासा! सुप्रीम कोर्टाचा आदेश काय?

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निकालासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. या मागणीला ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात विरोध केला. मात्र, प्रकरणात दोन लाखांहून अधिक कागदपत्रे आलेली आहेत. त्यामुळे 21 जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, असे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी आता 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे नार्वेकरांना दिलासा मिळाला असून, ठाकरेंना झटका बसला आहे.
  • ADVERTISEMENT

  • 01:11 PM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : ठाकरेंच्या नेत्याचा 1993 बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत डान्स; नितेश राणेंनी व्हिडीओच दिला

    भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले. नितेश राणे म्हणाले, "1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो पॅरोलवर बाहेर येतो आणि पार्टी करतो. या पार्टीमध्ये नाशिकचे शिवसेना (उबाठा) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यासोबत पार्टी करतात. याचा पुरावा म्हणून मी हा फोटो आज सभागृहात आणला आहे", असे म्हणत राणेंनी या मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतलं. ते पुढे म्हणाले, "एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी अशा व्यक्तीसोबत पार्टी करतो, तर हा सुधाकर बडगुजर कुणाच्या ताकदीने हे करतोय? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्याचे फोन आलेले? या सगळ्याची चौकशी व्हावी", अशी मागणी नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.
  • 11:52 AM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : सरकार मराठा समाजाच्या विरोधात काम करतेय-जरांगे पाटील यांची टीका

    सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. 'सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? कोपर्डी प्रकरणाचा अजूनही निकाल लागलेला नाही, आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांबाबत काय भूमिका घेतली हे जगजाहीर आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची भूमिका काय आहे?' असे प्रश्न विचारत सरकार मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
  • 11:02 AM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : मनोज जरांगेंनी जाहीर केली नवी तारीख, सरकारला दिला कोणता इशारा?

    'मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितले. नोंदीच्या आधारे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करा. 24 डिसेंबरच्या आत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, असा पुर्नरुचार त्यांनी केला. 17 डिसेंबर रोजी आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचेही सांगत जरांगेंनी सरकारला इशारा दिला.
  • 10:11 AM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची इशारा सभा

    बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील इशारा सभा घेणार आहेत. सभेच्या पूर्व तयारीसाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. सकल मराठा क्रांतीच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
  • 09:58 AM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : धारावी बचावासाठी मोर्चा निघणार आम्ही आंदोलन करू- संजय राऊत

    'सरकारचे उद्योगपती जावई मुंबई गिळंकृत करायला निघाले आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी बचावासाठी मोर्चा निघणार, आम्ही आंदोलन करणार' असं संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
  • 09:52 AM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : सुप्रीम कोर्ट काय करणार?

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटातील नेत्यांची उलटतपासणी झाली आहे. दरम्यान, आता युक्तिवाद सुरू होणार असून, त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरच्या आत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेण्याचे आदेश दिलेले असताना हे प्रकरण आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देण्यासाठी आणखी 21 दिवस वाढवून द्यावेत अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर शुक्रवारी (15 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
  • 09:52 AM • 15 Dec 2023

    Marathi News Live Update : राज्यात सगळा खेळखंडोबा सुरूये- संजय राऊतांची टीका!

    'राज्यात सगळा खेळखंडोबा सुरू आहे. खुर्चीवर बसलेल्यांनीच ५ वेळा पक्षांतर केलं आहे. विधानसभा अध्यक्षांना आणखी किती वेळ वाढवून हवा.' असा आरोप करत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT