बुलढाणा : गळफास घेताना सेल्फी घेत विवाहीतेची आत्महत्या, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारिरिक व मानसिक जाचाला कंटाळून बुलढाण्यात विवाहीतेने आत्महत्या केली आहे. जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कठोरा भागात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विवाहीतीने आत्महत्या करण्याआधी गळफास घेतलेला आपला सेल्फी काढला होता. मेधा वाघ असं या पीडित मृत महिलेचं नाव आहे. लग्न झाल्यानंतर […]
ADVERTISEMENT
लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारिरिक व मानसिक जाचाला कंटाळून बुलढाण्यात विवाहीतेने आत्महत्या केली आहे. जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कठोरा भागात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विवाहीतीने आत्महत्या करण्याआधी गळफास घेतलेला आपला सेल्फी काढला होता.
ADVERTISEMENT
मेधा वाघ असं या पीडित मृत महिलेचं नाव आहे. लग्न झाल्यानंतर मेधाला सासरचे मंडळी सारखा जाच करायचे. तुला स्वयंपाकच येत नाही, जेवण जास्त करते अशा छोट्या-मोठ्या कारणांवरुन पती आणि इतर मंडळींकडून मेधाचा वारंवार शारिरिक आणि मानसिक छळ व्हायचा. या त्रासाला कंटाळून मेधाने हे टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी मेधाने गळफास घेतानाचा सेल्फी काढून नातेवाईंना व्हिडीओ कॉलवर आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.
या घटनेनंतर मेधा हिचे वडील देविदास राजुस्कर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पती पवन वाघ, सासरा सुभाष वाघ, सासू महानंदा वाघ आणि दीर गणेश यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. PSI राहुल कातकाडे प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे वाचलं का?
Pune Crime : शिरुर हादरलं ! विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT