सरणार कधी रण? हे फोटो पाहून तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहे. दररोज आरोग्य यंत्रणेवर येत असलेल्या ताणामुळे प्रत्येक दिवशी मृतांच्या संख्येत चिंताजनक वाढ होते आहे. ज्यामुळे स्मशानभूमीमध्ये असं विदारक चित्र पहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सध्याचा काळ हा खडतर आहे…प्रत्येक दिवशी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी तयारी करताना एक कर्मचारी…

ADVERTISEMENT

लॉकडाउन काळात अंत्यविधीसाठी सरकारी यंत्रणांनी काही नियम आखून दिले आहेत. यात मृत व्यक्तीच्या परिवारातील काही ठराविक सदस्यांना पीपीई किटमध्ये स्मशानभूमीत परवानगी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाशी लढताना प्राण गमावलेल्या रुग्णांचा शेवटचा प्रवासही सोपा नाहीये. अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये स्मशानभूमीबाहेर असंच काहीसं चित्र दिसत आहे.

मृतदेहाला अग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत लाकडं आणि इतर साधनसामग्रीची तयारी करताना कर्मचारी वर्ग…

आपल्या जवळच्या नातेवाईकाला शेवटचा निरोप दिल्यानंतर मग नातेवाईंच्या अश्रूंचा बांध अशा पद्धतीने फुटतो…

कोरोनाशी युद्ध हरलेल्या व्यक्तीला अंत्यविधीसाठी स्मशानात आणताना त्याचे नातलग

अनेक ठिकाणी मृतदेहाला अग्नी देण्याचं काम हे स्थानिक कर्मचारी करत आहेत.

देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये स्मशानभूमीत असं चित्र आहे. दिल्लीतील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठीची वेटिंग लाईन…मरणानंतरही शेवटचा प्रवास खडतर होतोच आहे.

लाकडाच्या ढिगाऱ्यावर हतबलतेने बसलेला एक नातेवाई…रुग्णाला वाचवण्यासाठी नातेवाईक गेल्या काही दिवसांमध्ये प्राणांची बाजी लावत आहेत. परंतू अनेकांना यात अपयश येताना दिसत आहे. अंत्यविधी पार पडल्यानंतर शेवटच्या आठवणी मनात साठवून घेत लोकं घरी परतत आहेत.

शेवटचा नमस्कार करताना….

जी परिस्थिती स्मशानभूमीत तिच परिस्थिती मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीत…दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा भारताला सर्वाधिक फटका बसत आहे.

देशाच्या प्रत्येक महत्वाच्या राज्यातल्या आरोग्य यंत्रणेवर सध्या ताण आहे. ज्या लोकांना अंत्यविधीसाठी आत जाण्याची परवानगी मिळत नाही ती लोकं अशा पद्धतीने बाहेर थांबून राहतात.

दिल्लीत काही ठिकाणी चक्क हातगाडीवरुन मृतदेह स्मशानभूमीत आणले जात आहेत. या फोटोतून गेल्या काही दिवसांत आरोग्य यंत्रणेवर किती मोठा ताण आहे हे कळून येतंय.

देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा…इंजेक्शनची कमतरता यामुळेही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

लॉकडाउन काळात आजही अनेक ठिकाणी लोकं नियम पाळताना दिसत नाहीयेत. अशा वेळी देशातील स्मशानभूमीमधलं हे विदारक चित्र पाहून लोकांनी नियम पाळून घरी बसावं अशी आशा सरकारी यंत्रणांकडून केली जात आहे.

शेवटचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शेवटचे प्रयत्न करताना नातेवाईक…

मृतदेह स्मशानभूमीत आणल्यानंतर चार क्षण विश्रांतीचे मिळतात…तेव्हा हे कर्मचारी अशा पद्धतीने आराम करतात.

देशातलं सध्याचं हे विदारक चित्र पाहून लोकांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य करून नियमांचं पालन करावं असं आवाहन सरकारतर्फे केलं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT