MCA election : संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे : चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली ‘एमसीए’ची निवडणूक आज

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज (20 ऑक्टोबर) होत आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाकडून अमोल काळे हे उमेदवार आहेत, तर मुंबई क्रिकेट गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संदीप पाटील यांच्यासमोर पवार-शेलार पॅनलचं आव्हान असल्याने अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. एमसीएच्या अध्यक्षपदाबरोबरच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज (20 ऑक्टोबर) होत आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाकडून अमोल काळे हे उमेदवार आहेत, तर मुंबई क्रिकेट गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संदीप पाटील यांच्यासमोर पवार-शेलार पॅनलचं आव्हान असल्याने अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.

एमसीएच्या अध्यक्षपदाबरोबरच कार्यकारी मंडळाच्या जागांसाठीही थेट लढत होत आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगात आणखी वाढण्याची शक्यता आहे.राज्यातल्या सत्तांतरानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी असं राजकीय चित्र बघायला मिळत आहे. त्यात एमसीए निवडणुकीत मात्र सर्वच पक्ष आणि नेते एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट अशा विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येऊन पवार-शेलार गटातून एमसीएची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच ‘एमसीए’ निवडणुकीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. एमसीएच्या सहसचिवपदासाठी दीपक पाटील यांच्याविरुद्ध कुणीही उमेदवारी अर्ज केलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे, तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईक विरुद्ध ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे पुत्र नील सावंत विरुद्ध मयांक खांडवाला अशी तिरंगी लढत होत आहे.

एमसीए निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण?
‘एमसीए’च्या कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर, संजीव खानोलकर आणि अरमान मल्लिक यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. कार्यकारी परिषदेच्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही रिंगणात आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp