तुंगनाथ मंदिरासमोर अभिनेत्री मीरा जोशीचा जबरदस्त डान्स; इंडिया रेकॉर्डवर कोरलं नाव
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी इंडस्ट्रीत स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर नुकतंच अभिनेत्री आणि कोरियोग्राफर मीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. High Range Book Of World Records तसंच इंडिया रेकॉर्ड्समध्ये मीराचं नावं लिहिलं गेलं आहे. तुंगनाथ इथल्या भगवान शिव यांच्या मंदिरासमोर डान्स परफॉर्म करणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात […]
ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी इंडस्ट्रीत स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर नुकतंच अभिनेत्री आणि कोरियोग्राफर मीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. High Range Book Of World Records तसंच इंडिया रेकॉर्ड्समध्ये मीराचं नावं लिहिलं गेलं आहे. तुंगनाथ इथल्या भगवान शिव यांच्या मंदिरासमोर डान्स परफॉर्म करणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात आलीये. तुंगनाथ येथे जगातील सर्वात उंचावरील भगवान शिव यांचं मंदिर आहे.

3470 मीटर इतक्या उंचीवर हे मंदिर आहे. भगवान शिव यांच्या तुंगनाथ मंदिरात जाण्याची मीरा हिची फार इच्छा होती. 16 मार्च रोजी मीराने चंद्रशीला ट्रेकला सुरुवात केली होती. यावर मीरा म्हणते, “मी सकाळी 6.30 वाजता चंद्रशीला शिखरावर पोहोचले होते. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर चंद्रशिला शिखरावर मी 2 डान्सचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. मुख्य म्हणजे सुदैवाने मंदिराचा परिसर बर्फाच्छादित नव्हता. त्यामुळे तातडीने संधी साधत शिव वर्णम गाण्यावर परफॉम केलं.”











