Microsoft चा सर्वात स्वस्त लॅपटॉप लाँच, किंमत फक्त…

मुंबई तक

मुंबई: मायक्रोसॉफ्टने (Microsoft) नुकताच स्वस्त लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपला Surface Laptop SE असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये Windows 11 चं खास व्हर्जन देण्यात आलं आहे. जे विशेषतः शाळेसाठी तयार करण्यात आलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या मते, Surface Laptop SE हा कंपनीचा सर्वात स्वस्त Surface लॅपटॉप आहे. त्याची किंमत 249 डॉलर (सुमारे 18,523 रुपये) आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मायक्रोसॉफ्टने (Microsoft) नुकताच स्वस्त लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपला Surface Laptop SE असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये Windows 11 चं खास व्हर्जन देण्यात आलं आहे. जे विशेषतः शाळेसाठी तयार करण्यात आलं आहे.

मायक्रोसॉफ्टच्या मते, Surface Laptop SE हा कंपनीचा सर्वात स्वस्त Surface लॅपटॉप आहे. त्याची किंमत 249 डॉलर (सुमारे 18,523 रुपये) आहे. या लॅपटॉपची विक्री पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून होणार आहे.

वास्तविक आजकाल सर्व कंपन्या सतत शिक्षणावर केंद्रित लॅपटॉप लॉन्च करत आहेत. ई-लर्निंगचा ट्रेंड वाढला असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत कंपन्या आता त्या दृष्टीने विचार करुन अफोर्डेबल सेगमेंटचे लॅपटॉप बाजारात आणत आहेत.

Microsoft च्या Surface Laptop SE चे खास फीचर्स

हे वाचलं का?

    follow whatsapp