Mid brain activation हा बुवाबाजीसारखाच प्रकार, अमिताभ बच्चन यांनी दिलगिरी व्यक्त करावी-मुक्ता दाभोलकर
कुवरचंद मंडले, प्रतिनिधी, नांदेड मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन हा बुवाबाजीसारखाच प्रकार आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये. तसंच हा फक्त फसवणुकीचा व्यवसाय आहे असा दावा आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी नांदेडमध्ये केला आहे. काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर? उजवा आणि डाव्या बाजूचा मेंदू अॅक्टीव्ह केला की अद्भूतशक्ती जागृत होते असा दावा केला जातो. आणि […]
ADVERTISEMENT

कुवरचंद मंडले, प्रतिनिधी, नांदेड
मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन हा बुवाबाजीसारखाच प्रकार आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये. तसंच हा फक्त फसवणुकीचा व्यवसाय आहे असा दावा आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी नांदेडमध्ये केला आहे.
काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर?
उजवा आणि डाव्या बाजूचा मेंदू अॅक्टीव्ह केला की अद्भूतशक्ती जागृत होते असा दावा केला जातो. आणि मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन या कोर्ससाठी मोठ्या प्रमाणात फी उकळली जाते. मात्र प्रत्यक्षात हा सगळा बुवाबाजी आणि भोंदूगिरीसारखाच प्रकार आहे. मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन असा काही प्रकार नसतो. दावा करणारे लोक हा दावा करतात की मिड ब्रेन अॅक्टिव्ह झालेली व्यक्ती डोळ्यांवर पट्टी बांधून वाचू शकते. हा दावा धांदात खोटा आहे. डोळ्यांशिवाय वाचता येणं निव्वळ अशक्य आहे. जे दाखवलं जातं तो आंधळी कोशींबीर या खेळाचा सफाईदार प्रकार आहे. पट्टीच्या आडून खाली पाहून वाचलं जातं. मिड ब्रेन अॅक्टिव्हेट न झालेली व्यक्तीही हे सफाईने करू शकते. त्यामुळे या प्रलोभनांना कुणीही बळी पडू नये. हे गैर प्रकार थांबवले पाहिजे अशीही मागणी मुक्ता यांनी केली आहे.