कठोर निर्बंध… म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार पाहा अगदी सविस्तरपणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण नेमके कठोर निर्बंध नेमके काय असणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक मुद्दा अगदी सविस्तरपणे स्पष्ट केला आहे. कोणत्या गोष्टी बंद असणार आणि कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याविषयी देखील त्यांनी संक्षिप्तपणे माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

सर्वात आधी आपण जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी बंद राहणार:

शनिवारी आणि रविवार हे विकेंडचे दिवस आहेत तेव्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन त्या लॉकडाऊनचा परिणाम साखळी तोडण्यात होईल. लोक घरात बसले तरच ही साखळी तुटेल. असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

CM ठाकरेंचा फडणवीस आणि राज ठाकरेंना फोन, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री

1. ज्या कंपन्यांमध्ये आपल्या प्रोडक्टसाठी सर्वाधिक ऑक्सिजनचा वापर केला जातो त्यांच्यावर काही प्रमाणात निर्बंध आणावे लागतील. कारण आपल्याकडे जेवढा ऑक्सिजन बनतोय त्यापैकी 80 ते 90 ऑक्सिजन आपण आरोग्य सेवेला देऊन देखील ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतोय. त्यामुळे अशा कंपन्या काही काळ बंद राहतील.

ADVERTISEMENT

2. ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये 5 आणि त्यापेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असतील ती सोसायटी किंवा तो भाग हा कन्टेंमेंट भाग असेल. त्या ठिकाणी कन्टेंमेंट झोनचे नियम जो पाळणार नाही त्या व्यक्तीवर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल

ADVERTISEMENT

3. रात्रीचा कर्फ्यू आहे. दिवसा देखील राज्यभरात जमावबंदी आहे.

4. गार्डन, तसेच अशी काही सार्वजनिक स्थळं जिथे गर्दी होत असेल तिथे रात्री आठ वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी असणार आहे. तसेच दिवसा देखील जर एखाद्या उद्यानात किंवा इतर ठिकाणी गर्दी होत असेल तर स्थानिक प्रशासन अधिक निर्बंध असणार आहे.

5. शॉप्स, मार्केट आणि मॉल्स या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद राहतील. हे सगळे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत असणार आहे.

6. मास्क न वापरता प्रवास केला तर 500 रुपये दंड असणार आहे.

7. जेवढे खासगी कार्यालये आहेत त्यांना ‘वर्क फ्रॉर्म होम’ अशाच स्वरुपाचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे खासगी कार्यालये बंद राहतील. त्यांनी घरुनच काम करावं.

8. सरकारी कार्यालये देखील यावेळी बंद राहतील.

9. थिएटर, नाट्यगृह, अम्युझमेंट पार्क यांच्यावर देखील निर्बंध असणार आहे. यावर बंदी असणार आहे.

10. रेस्टॉरंट आणि बार हे पूर्णपणे बंद राहतील.

11. जेवढी धार्मिक स्थळं आहेत पूर्णपणे बंद राहतील

12. केशकर्तनालय, सलून, ब्यूटी पार्लर या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

13. राजकीय सभा, समारंभ याच्यावर बंदी असणार आहे. याशिवाय ज्या निवडणुका आहेत त्या देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

14. जिम आणि इनडोअर गेम्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा, तर उद्यापासून कठोर निर्बंध होणार लागू

पाहा आता या कठोर निर्बंधादरम्यान कोण-कोणत्या गोष्टी सुरु असतील:

1. उद्योग क्षेत्र आणि कन्सट्रक्शन त्यांना कुठलाही धक्का लावलेलं नाही. फक्त तेथे काम करणाऱ्या कामगारांची काळजी संबंधित कंपनी किंवा मालकाने घेणं गरजेचं. कामगारांनी फार प्रवास करु नये अशी सोय करावी.

2. बँकिंग, इन्शुरन्स आणि मेडिक्लेम आणि पूर्वी ज्याप्रमाणे आपण इतर अत्यावश्यक सेवांना सूट दिली होती तशाच स्वरुपाची सूट असणार आहे.

3. अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवाच सुरु राहणार आहे.

4. कोरोनाशी संबंधित आरोग्य विभाग आणि इतर विभाग हे संपूर्ण क्षमतेने सुरु राहतील. त्याला सगळ्यांनी हजर राहणं गरजेचं आहे. पण याव्यतिरिक्त इतर खात्यातील लोकांनी 50 टक्के उपस्थितीत कार्यालये सुरु ठेवायची आहेत.

5. मंत्रालयात जे व्हिझिटर्स लसीकरण आले असतील तरच त्यांना सोडण्यात येईल. लसीकरणाचा पुरावा त्यांना सोबत आणावा लागेल.

6. आऊटडोर गेम्स काही प्रमाणात सुरु राहतील.

7. फक्त दिवसा गार्डन सुरु असतील.

8. ई-कॉमर्समध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्या सुरु राहतील. त्यांच्यावर बंधनं येणार नाहीत.

9. शॉप्स, मार्केट आणि मॉल्स या ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु राहतील.

10. साखर कारखाने पूर्णत: सुरु राहतील.

11. अन्न-धान्याच्या संदर्भात जे दळणवळण आहे त्याला काहीही बंधन नाही.

12. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ण सुरु राहतील. त्यावर कोणतीही बंधनं नसतील. प्रायव्हेट बसेस देखील सुरु असतील. पण त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागेल. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जर हे नियम पाळले नाही तर प्रत्येकी 500 रुपये दंड असणार आहे.

13. 50 जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पडतील तर अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. जर तसं झालं नाही संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

14. हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरु राहील. ज्या पण जे हॉटेल आहेत जिथे लोकं रुममध्ये राहतात तेथील लोकांसाठी हॉटेलचं रेस्टॉरंट आणि बार सुरु असेल.

15. सिनेमा, सिरीयल यांचं शूटिंग सुरु राहील. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन हे शूटिंग करता येणार आहे.

16. 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C तयार केला आहे. याबाबत त्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन नेमक्या कशा पद्धतीने परीक्षा घ्यायच्या हे ठरवतील.

17. रेमडेसीविर आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा जलद गतीने वाढवा यासाठी प्रयत्न सुरु झाला आहे.

18. लसीकरण हे 24 तास सुरु राहावी अशी आमची मागणी आहे. त्यासंदर्भात आमचे विशेष प्रयत्न आहेत.

19. हा प्राथमिक स्वरुपातील निर्णय आहे. यातील अधिक संक्षिप्त निर्णय लवकरच आपल्यासमोर येतील.

दरम्यान, हे सगळे निर्णय उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून लागू असणार आहे. त्यामुळे आता उद्यापासून लागू होणारे हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत कायम असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT