इंजिनीअर, पीजी, पीएचडी केलीय; अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का? तानाजी सावंत भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत सध्या प्रचंड चर्चेत आहेत. नुकतचं पुण्यातील ससून रुग्ण्यालयात ‘हाफकीन’ या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा असं तानाजी सावंत यांनी म्हटल्याचं एका वृत्तपत्रात छापून आले होते. त्यावरुन सावंत यांची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडविण्यात आली. मात्र “मी अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का?” असं म्हणतं ते माध्यमांवर आरोग्यमंत्री भडकल्याच चित्र पाहायला मिळालं.

ADVERTISEMENT

काय म्हणाले, मंत्री तानाजी सावंत?

सोलापुरमध्ये बोलताना डॉ. तानाजी सावंत म्हणाले, माध्यमांना हे सरकार आलेलं रुचत नाही. मी इंजिनियर आहे, डिप्लोमा, डिग्री, पीजी, पीएचडी मिरीटमध्ये केलं आहे. त्यामुळे ‘हाफकीन’ या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा असं मी बोललोच नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्री यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये ‘हाफकिन’ या औषध कंपनीच डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे आणि यामध्ये नवीन औषधीय संस्था येणं गरजेचं आहे, असं सांगितलं.

सामना अग्रलेख : PM नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप

हे वाचलं का?

एकदा माझ्या नेट वरती जाऊन बघा मी किती शिक्षण संस्था आणि साखर कारखाने चालवतो, माझ्याकडे स्टाफ किती आहे, किती क्वालिटीचा आहे. जवळपास ३०० पीएचडी होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. मी तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का? अशा भावना व्यक्त करत सावंत यांनी संताप व्यक्त केला.

सायरस मिस्त्रींची मुलं विद्यार्थी तर पत्नी कॉर्पोरेट आयकॉन…जाणून घ्या संपूर्ण कुटुंबाबद्दल

ADVERTISEMENT

तसंच मागच्यावेळीही तिवारे धरण फुटीचा खेकड्याशी थेट संबंध लावत सोलापुरातून चुकीची बातमी लावण्यात आली. त्यामुळं इथून पुढ मी बोललो तेच दाखवणार नसाल तर माध्यमांनी माझ्यासमोर येऊ नये, असं म्हणतं मंत्री सावंत यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतलं. त्याचबरोबर ‘हाफकीन’ माणसाकडून औषध घेऊ नका, असं मी बोललो असेन तर मी आत्ता राजीनामा देतो” असंही सावंत म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT