Uday Samant : प्रकल्प नेमके कोणामुळे गेले? माजी न्यायाधीशांची समिती करणार चौकशी
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या आरोपांना माजी न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून उत्तर देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. ही तीन सदस्यांची समिती असून गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सामंत म्हणाले, काल झालेली […]
ADVERTISEMENT
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या आरोपांना माजी न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून उत्तर देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. ही तीन सदस्यांची समिती असून गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
सामंत म्हणाले, काल झालेली पत्रकार परिषद ही केवळ राजकीय होती. मागील ३ महिन्यांपासून प्रकल्प येत नाहीत असं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण माहिती अधिकारात सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत. तरीही पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. सिनार्मस या प्रकल्पाचा करार दावोसला झाला असा दावा त्यांनी केला. त्यात कुठलंही दुमत नाही. मात्र करार झाला म्हणजे उद्योग आला असे होत नाही. काल त्यांना जमीन वाटप देकार पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दिले.
वेदांता-फॉक्सकॉनबाबत काय म्हणाले उदय सामंत?
यावेळी आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेल्या वेदांताबाबतच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी काही तारखा आणि बैठका याविषयी माहिती दिली. तसंच आदित्य ठाकरे यांनी ज्याप्रमाणे एमआयडीसीचं पत्र सादर केलं, त्याच प्रमाणे सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं एक पत्र समोर आणलं.
हे वाचलं का?
सामंत म्हणाले, २४ मे २०२२ रोजी वेदांतासंदर्भात दावोसमध्ये एक बैठक झाली होती. त्यानंतर जूनमध्ये दिल्लीतही बैठक झाली, पण या दोन्ही बैठकांचा इतिवृत्त आपल्याकडे नाही. हायपॉवर कमिटीची स्थापना झाली नव्हती. १४ जुलै २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताच्या अनिल अग्रवाल यांना एक पत्र दिले. त्यानंतर १५ जुलैला हायपावर कमिटीची स्थापना झाली. त्यांनी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न केला.
१५ जुलैला मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले. महाराष्ट्रामध्ये येऊन प्रकल्प सुरु करा असं त्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा पत्र लिहिलं. पण वेदांत फॉक्सकॉन संदर्भात करार झाला नव्हता. फक्त आता सिनार्मसचा जाणारा प्रकल्प थांबला. म्हणून युवापिढीसमोर दुसरा काही तरी विषय ठेवायचा यासाठी हे प्रयत्न सुरु आहे. म्हणून या पत्रकार परिषदा होतं आहेत. डावोसला ३० हजार ४९८ कोटींचे करार झाले. त्यात १० हजार कोटींचा प्रकल्प हा सिनार्मसचा करार होता. हा प्रकल्प आम्ही घेऊन आलो. येत्या काळात ५० हजार कोटींचे प्रकल्प येतील. उद्योगांना रेड कार्पेट देणारे हे सरकार आहे.
ADVERTISEMENT
तीन सदस्यीय समिती :
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी गेलेल्या प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढत आहोत, अशी माहिती दिली. तसंच आरटीआयमध्ये माहिती समोर आली आहे. याशिवाय 3 सदस्यीय समिती नेमतं आहोत. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. ही समिती गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना इशारा :
यावेळी उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना इशाराही दिला. उद्योग मंत्री काम करत नाहीत आणि इतर कोणीतरी खातं चालवतं असं ज्यांना सातत्याने वाटतं ते मागच्या साडे सात वर्षांचा अनुभव सांगत असतील. पण मागच्या सरकारमध्ये उद्योग, एमएमआरडीए आणि आयटी या विभागांच्या बैठका कोण आणि कुठे घेत होतं हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका. आयटी विभागात काय काय झालं आणि यामध्ये कोण कोण सहभागी होतं यासाठी स्वतंत्र पत्रकार पारिषद घेईन, असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT