कचरा कुंडीत सापडलेल्या चिमुरडीला ‘या’ दिग्गज अभिनेत्याने दिले स्वत:चे नाव! आज ‘ती’ स्टायलिश अभिनेत्री
‘मिथुन चक्रवर्ती’ यांना एक कन्या आहे. तिचं नाव दिशानी चक्रवर्ती आहे. दिशानीला मिथुन दा आणि त्यांची पत्नी योगिता बाली यांनी दत्तक घेतले आहे. तिच्या जीवनाशी संबंधित असलेली ही माहिती वाचा सविस्तर
ADVERTISEMENT
Mithun Chakraborty Adopted Daughter : सध्या बॉलिवूड विश्वात स्टार किड्सचा दबदबा आहे. अशीच एक नवीन स्टार कीड लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा आहे. तिचं नाव दिशानी चक्रवर्ती आहे. ग्लॅमरस आणि फॅशनेबल असणाऱ्या दिशानीला आपण याआधीही पाहिले असावे. ती लाइमलाइटपासून जरी दूर असली तरी इंस्टाग्रामवर ती नेहमी अॅक्टिव्ह असते. दिग्गज अभिनेते तसेच, डिस्को डान्सर म्हणून ओळख असलेले मिथुन दा अर्थात ‘मिथुन चक्रवर्ती’ यांची ही कन्या आहे. पण तुम्हाला माहित आहे का? दिशानीला मिथुन दा आणि त्यांची पत्नी योगिता बाली यांनी दत्तक घेतले आहे. तिच्या जीवनाशी संबंधित असलेली ही माहिती वाचा सविस्तर…(Mithun Chakraborty Adopted a Baby Girl Who Found in Garbage her name is Dishani Chakraborty now she is Actress)
ADVERTISEMENT
कचरा कुंडीत सापडली होती ‘ही’ चिमुरडी
मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना तीन मुलं आहेत. झालं असं की, एकेदिवशी बंगाली वृत्तपत्रात, एक चिमुरडी कचरा कुंडीत सापडल्याची बातमी आली. ही बातमी चक्रवर्ती कुटुंबियांनी वाचली. मन हेलावणाऱ्या या घटनेने मिथुन चक्रवर्ती यांना सुन्न पाडले. त्यांनी तत्काळ याबाबत माहिती मिळवली.
CM शिंदे, फडणवीसांची मुलाखत, सोनाली, रितेश देशमुखशी गप्पा, ‘मुंबई Tak बैठक’ असणार खास
त्यानंतर मिनुथ दाचं पत्नी योगिता यांच्याशी याविषयावर बोलणं झालं आणि योगिता यांनी मिथुन दा ला साथ दिली. दोघांनीही कायदेशीररित्या चिमुकलीला घरी आणले आणि तिला आपलं नाव देत दिशानी चक्रवर्ती असे तिचे नाव ठेवले.
हे वाचलं का?
मिथुन चक्रवर्तींना तीन मुलांमध्ये एक कन्यारत्न लाभले..
मिथुन दा आणि योगिता हे दोघं त्यांच्या तीन मुलांपेक्षाही जास्त दिशानीवर प्रेम करतात. दिशानी त्यांच्या काळजाचा तुकडा आहे. तसेच तिचे तीन भाऊही तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. तिच्या येण्याने त्यांचे कुटुंब पूर्ण झाले.
HDFC बँकेने ग्राहकांचा भार केला हलका, EMI होणार कमी
दिशानी आता मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत ती अनेक फोटो पोस्ट करते. तिच्या या फोटोंमधून मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत असलेला तिचा बाप-लेकीचा खास बाँड दिसून येतो. तिने तिचे शिक्षण नियॉर्क फिल्म अकॅडमीमधून पूर्ण केले आहे. तिने आतापर्यंत ‘होली स्मॉक’ आणि ‘अंडरपास’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. असं म्हटलं जातं की, दिशानीने स्टूडेंट ऑफ द ईयरसाठी ऑडिशन दिले होते. पण तिची निवड झाली नाही. भविष्यात ती इतर बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
ADVERTISEMENT
Crime: पत्रकार म्हणून मिरवलं, पण डान्स बारने सारं काही हिरवलं; पैशासाठी…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT