आमदार प्रशांत बंब शिक्षकांप्रती कृतज्ञ, पाद्यपूजन करुन व्यक्त केली भावना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कन्नड: भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांप्रती दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. आणि आज त्याच शाळा मुख्यालयात जाऊन प्रशांत बंब यांनी महिला शिक्षकांचे पाद्य पूजन केले आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षकांवरती गंभीर स्वरुपाचे आरोप करणारे प्रशांत बंब आज शिक्षकदिनी पूजा करतात याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

शिक्षकांचे पूजन केल्यानंतर प्रशांत बंब काय म्हणाले?

दोन दिवसापूर्वीच प्रशांत बंब यांनी जाहीर केले होते की जे शिक्षक शाळा मुख्यालयात राहतात त्यांचा सन्मान करणार, त्याचप्रमाणे आज त्यांनी शाळा मुख्यालयात जाऊन महिला शिक्षकांचे पूजन केले. यावेळी ते म्हणाले ”माझं हेतू शुद्ध आहे. आज शिक्षक दिन आहे, शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे. जे शिक्षक शाळा मुख्यालयात राहतात त्यांचं पूजन करायला आज मी आलो आहे. 27 शिक्षक या शाळेत आहेत, त्यापैकी 3-4 शिक्षक फक्त मुख्यालयात राहत आहेत.”

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते प्रशांत बंब?

”शिक्षकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वादंग आहे. कुणाचे काही गैरसमज झाल्याचंही वाटतं. राज्यातील 70 टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. मुख्यालयी राहण्याचं आम्हाला बंधन नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यांना कुठेही राहून घर भाडं भत्ता मिळत आहे.”

हे वाचलं का?

पुढे बंब म्हणाले ”मी औरंगाबादला गेलो. तेव्हा कार्यकारी अधिकारी यांनी बीआरसी कमिटीला सांगितलं की, 100 टक्के शिक्षक हे मुख्यालयी राहतात. त्यानंतर मी माझी 40-40 मुलं जिल्ह्यात पाठवली. प्रत्येक गावात जाऊन शिक्षकांची घरे पाहिली. तिथे शिक्षक राहत नव्हते. 90 टक्के शिक्षक त्याच गावात राहत नव्हते. शिक्षक हे धादांत खोटे बोलत आहेत. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत आहेत.”

प्रशांत बंब यांची ऑडीओ क्लिप व्हायरल

मतदार संघातील शाळांबाबत प्रशांत बंब यांना एका जिल्हा परिषद शिक्षकांनं चांगलचं धारेवर धरलं होतं. ”तुमच्या तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शौचालयं नाहीत, पत्रे उडाले आहेत. तुमचं या शाळांकडे लक्ष आहे का? तुम्ही सरकारी कायद्याबाबत इतकं बोलता, पण तुमच्या भागातील शाळांची तरी तुम्हाला काळजी आहे का?.”

ADVERTISEMENT

पुढे ऑडीओ क्लिपमध्ये शिक्षक आणि बंब यांच्या शाब्दिक चकमक झाली. आमदार म्हणाले अगोदर तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या शाळेत शिकवा. त्यावर शिक्षकानं उत्तर दिलं होतं की माझ्या मुलीला मी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवले. त्यावर प्रशांत बंब म्हणाले की, ‘तुमच्या एकट्याची असेल म्हणून काय झालं, मुर्खासारखं बोलू नका’.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT