अर्धा मिनीट उशीर झाला अन् दारं बंद झाली; आमदाराने सांगितले मतदानाला हजर न राहण्याचे कारण
मुंबई: एकनाश शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आणि भाजपने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. बहुमतासाठी झालेल्या (Maharashtra Floor Test) मतदानावेळी आम्हाला सभागृहात जाण्यासाठी फक्त अर्धा मिनीट उशीर झाला त्यामुळे विधानसभेची दारं बंद झाली आणि आम्हाला बाहेरच थांबावे लागले. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह जवळपास […]
ADVERTISEMENT
मुंबई: एकनाश शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आणि भाजपने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. बहुमतासाठी झालेल्या (Maharashtra Floor Test) मतदानावेळी आम्हाला सभागृहात जाण्यासाठी फक्त अर्धा मिनीट उशीर झाला त्यामुळे विधानसभेची दारं बंद झाली आणि आम्हाला बाहेरच थांबावे लागले. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह जवळपास १५ आमदार मतदानापासून वंचित राहिले.
ADVERTISEMENT
या संदर्भात आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्याशी संपर्क केला असाता त्यांनी सर्व आपबिती सांगितली. आज विधानभवनात जवळपास १९ आमदारांनी मतदान केले नाही म्हणजे ते सभागृहात उपस्थीत नव्हते. त्याचबरोबर ३ आमदार तटस्थ राहिले आहेत.
संग्राम जगतापांनी (Sangram Jagtap) सांगितला घटनाक्रम...
हे वाचलं का?
सभागृहात उपस्थीत न राहण्यावरुन आमदार जगताप म्हणाले, आम्हाला सभागृहात जाण्यासाठी अवघा अर्धा मिनीट उशीर झाला, त्यामुळे विधानभवनाची दारं बंद झाली. आम्हाला एवढ्या वेळेत दरवाजे बंद करतील असे कधीच वाटले नव्हते यामुळे त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.
कालपर्यंत महाविकास आघाडीचे अध्यक्ष होते त्यांनी कधीच एवढ्या वेळेत दरवाजे बंद केले नाहीत. मतदान प्रक्रिया ११.३० वाजताच्या पुढे सुरु होते. आम्ही ११ वाजता विधानभवनाच्या प्रांगणात पोहोचलो होतो. सर्वांनी सोबत जायचं म्हणून अर्धा मिनीट उशीर झाला, तेव्हा लगेच दरवाजे बंद करण्यात आले. परिणामी आम्हाला आमदारांच्या लॉबित बसावे लागले असे संग्राम जगताप यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी देखील आपलं मत मांडले. आम्हाला यायला उशीर झाला, आम्ही आत जाण्यासाठी विनंती केली पण आम्हाला घेतलं नाही असे सिद्दीकी म्हणाले.
ADVERTISEMENT
Trust Vote Live : विश्वासदर्शक ठरावावेळी वार-पलटवार! नेत्यांच्या भाषणांची मुसळ’धार’
ADVERTISEMENT
‘हे’ आमदार अनुपस्थीत तर काही तटस्थ
1) नवाब मलिक – राष्ट्रवादी
2) अनिल देशमुख – राष्ट्रवादी
3) दिलीप मोहिते – राष्ट्रवादी
4) दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी
5) अण्णा बनसोडे – राष्ट्रवादी
६) बबन दादा शिंदे – राष्ट्रवादी
७) नरहरी झिरवाळ – (उपाध्यक्ष)
8) संग्राम जगताप- राष्ट्रवादी
8) मुक्ता टिळक – भाजप
9) लक्ष्मण जगताप – भाजप
10) मुफ्ती इस्माईल – एमआयएम
11) प्रणिती शिंदे – काँग्रेस
12) जितेन अंतापूरकर – काँग्रेस
13) अशोक चव्हाण – काँग्रेस
14) विजय वडेट्टीवार – काँग्रेस
15) झीशान सिद्दीकी – काँग्रेस
16) धीरज देशमुख – काँग्रेस
17) कुणाल पाटील – काँग्रेस
मृत
18) रमेश लटके – शिवसेना
तटस्थ
19) अबू आझमी – सपा
20) रईस शेख – एस.पी
21) शाह फारुख अन्वर – एमआयएम
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT