Election : काँग्रेस, NCPने डाव टाकला! पण ठाकरेंचे हात रिकामाचे राहणार?

मुंबई तक

विधान परिषदेच्या एका निवडणुकीनं महाराष्ट्राचं राजकारण उलटंपालटं करून सोडलं. ३६० अंशाच्या कोनात फिरवलं. आता सहा महिन्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे सूप वाजलेत. पाच जागांसाठी ही निवडणूक होतेय. ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्याचं कारण काय आणि महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे ठाकरेंचे हात रिकामेच राहणार का, हेच समजून घ्या… […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विधान परिषदेच्या एका निवडणुकीनं महाराष्ट्राचं राजकारण उलटंपालटं करून सोडलं. ३६० अंशाच्या कोनात फिरवलं. आता सहा महिन्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे सूप वाजलेत. पाच जागांसाठी ही निवडणूक होतेय. ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्याचं कारण काय आणि महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे ठाकरेंचे हात रिकामेच राहणार का, हेच समजून घ्या…

MLC Election 2023 : विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झालीये. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होतेय. नाशिक आणि अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक आहे. म्हणजेच सत्तांतर घडवून आणणाऱ्या निवडणुकीत आमदारांनी आमदार निवडून दिला. तर या निवडणुकीत तुम्हाला नावावरूनच लक्षात आलं असेल की, शिक्षक आणि पदवीधर हे आमदार निवडून देणार आहेत.

विधान परिषदेच्या 5 सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपणार आहे. यासाठी 12 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

या मतदारसंघाचं सध्याचं गणित काय आहे ते समजून घ्या?

पाच जागांमध्ये राष्ट्रवादी 1, भाजप 1, काँग्रेस 1, शेकाप 1 आणि 1 जागा अपक्षांकडे आहे. शेकापची जागा काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत तर 1 अपक्ष भाजप पुरस्कृत आहे. यामध्ये नाशिकमधून काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावतीमधून भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकणातून शेकापचे बाळाराम पाटील आणि नागपूरमधून नागो गाणार हे 2017 मध्ये विजयी झाले होते. दर सहा वर्षांनी विधान परिषदेचे आमदार निवृत्ती होतात. आणि त्याच नियमानुसार ही निवडणूक होतेय.

हे वाचलं का?

    follow whatsapp