MNS-BJP: ‘मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही’, पाहा प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले
मुंबई: राज्यात लवकरच अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी राज्यातील महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता सातत्याने वर्तवली जात आहे. मात्र, अशी चर्चा असली तरी तसा कोणाताही प्रस्ताव मनसेला देण्यात आलेला नाही अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं की, […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात लवकरच अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी राज्यातील महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता सातत्याने वर्तवली जात आहे. मात्र, अशी चर्चा असली तरी तसा कोणाताही प्रस्ताव मनसेला देण्यात आलेला नाही अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं की, ‘मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र याबाबत निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील.’
त्यामुळे आगामी काळात मनसेसोबत युती होणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. कारण मनसे आणि भाजपची महापालिका निवडणुकीत युती झालीच तर मात्र, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळेच भाजप मनसेला आपल्या साथीला घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप-मनसेच्या युतीचा नारळ फुटला!