राज ठाकरे झाले आजोबा, शिवतिर्थावर नव्या पाहुण्याचं आगमन!
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आजोबा झाले आहेत. कारण राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना आज (5 एप्रिल) एका चिमुकल्याला जन्म दिला आहे.आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजे शिवतिर्थावर आनंदाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिताली […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आजोबा झाले आहेत. कारण राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना आज (5 एप्रिल) एका चिमुकल्याला जन्म दिला आहे.आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजे शिवतिर्थावर आनंदाचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याचं समजतं आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने संपूर्ण ठाकरे कुटुंबीय सध्या खूपच आनंदात आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.
काही महिन्यापूर्वीच राज ठाकरे हे ‘कृष्णकुंज’हून बाजूलाच बांधलेल्या शिवतिर्थावर राहण्यासाठी गेले होते. त्याच शिवतीर्थावर आता चिमुकल्याचं आगमन झालं आहे.
मिताली ही एक फॅशन डिझायनर आहे. तिने फेड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझाइनिंगचं शिक्षण घेतलं आहे. तर मितालीचे वडील हे प्रख्यात डॉक्टर आहेत. राज ठाकरे यांची कन्या उर्वशी आणि मिताली या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी दोघींनी ‘द रॅक’ नावाने एक कपड्यांचा ब्रँडही लाँच केला होता.