Raj Thackeray: ‘एकदा काय ते होऊन जाऊ द्या!’, अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!
औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (1 मे) औरंगाबादमधील भाषणादरम्यान मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडली. दरम्यान, त्यांच्या भाषणात एक अशी घटना घडली की, ज्यामुळे राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्यांवर अधिकच संतापले. नेमकं काय झालं? औरंगाबादमधील सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी ते मशिदीवरील भोंग्यांवर बोलत होते. पण त्याचवेळी […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (1 मे) औरंगाबादमधील भाषणादरम्यान मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडली. दरम्यान, त्यांच्या भाषणात एक अशी घटना घडली की, ज्यामुळे राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्यांवर अधिकच संतापले.
नेमकं काय झालं?
औरंगाबादमधील सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी ते मशिदीवरील भोंग्यांवर बोलत होते. पण त्याचवेळी अजान सुरु झाली आणि त्याचा आवाज राज ठाकरेंच्या कानी पडला. अजानचा आवाज पडताच राज ठाकरे हे प्रचंड संतापले.
‘इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय की, त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे बंद करा. आणि माझं म्हणणं आहे याबाबतीत की, त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल ना. तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या…’