Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, आईलाही लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना लागण झाली असल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. याशिवाय राज ठाकरे यांचा बहिणीला आणि त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झालं असल्याचं समजतं आहे. (MNS chief Raj Thackeray and his mother Kunda Thackeray tested corona positive)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांना सौम्य लक्षणं आढळून आली. ज्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या बहिणीला देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचं सांगण्यात येत आहे.

खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंसह त्यांच्या आई आणि बहिणीला लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं असून इथे त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल देण्यात येणार आहे. हे अँटीबॉडी दिल्यानंतर या सगळ्यांना तीन तासांनी घरी सोडण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने मनसेचे नियोजित मेळावे देखील स्थगित करण्यात आले आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देखील माहिती देण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.२३/१०/२०२१ रोजी मुंबईत, तर दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.’ असं ट्विट मनसे अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

कोरोना लाटेतही राज ठाकरे वापरत नव्हते मास्क

ADVERTISEMENT

दरम्यान, कोरोनाच्या लाटेत देखील राज ठाकरे हे मास्क लावत नव्हते. मी मास्क वापरतच नाही असं त्यांनी अनेकदा मीडियासमोर सांगितलेलं होतं. त्यांच्या या वर्तनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या संबोधनातून अप्रत्यक्षपणे खडे बोलही सुनावले होते.

‘अनेक जणांना वाटतं की मास्क का लावतोय तू? मास्क न लावण्यात काय शौर्य आहे? मी मास्क वापरत नाही, मी मास्क वापरणार नाही… काय शूर आहेस? मास्क न वापरणं या शूरता नाही. मास्क लावायला लाजण्याची गरज नाहीए. परत एकदा सांगतो लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावायलाच पाहिजे.’ अशा मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना सुनावलं होतं.

मात्र, त्यानंतरही देखील अनेक जाहीर कार्यक्रमात आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे हे विनामास्कच दिसून आले होते.

मास्क न लावण्यावरुन मुख्यमंत्री संतापले, नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं!

‘त्यांना माझा नमस्कार आहे!’, उद्धव ठाकरेंनी लगावला होता उपरोधिक टोला

राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मराठी भाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमात कोरोनाविषयक धोरणांवर सरकारवर जोरदार टीका केली होती. एवढंच नव्हे तर ‘मी मास्क घालणार नाही.’ असंही म्हटलं होतं. याचविषयी त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी यांनी अगदी उपरोधिकपणे असं म्हटलं होतं की, ‘त्यांना माझा नमस्कार आहे.’ असं म्हणत मोजक्या शब्दांत राज ठाकरेंवर टीका केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT