राजकीय रणधुमाळीतही राज ठाकरे जेव्हा वाचनाची आवड जोपासतात, पुणे दौऱ्यात केली पुस्तकांची खरेदी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांमुळे राज ठाकरेंनी राज्यातलं राजकारण चांगलंच तापवलं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी या सध्याच्या राजकीय रणधुमाळीतही आपली वाचनाची आवड जोपासलेली पहायला मिळाली. दोन दिवस पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी मंगळवारी रात्री आठ वाजता पुण्याच्या बाजीराव […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांमुळे राज ठाकरेंनी राज्यातलं राजकारण चांगलंच तापवलं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी या सध्याच्या राजकीय रणधुमाळीतही आपली वाचनाची आवड जोपासलेली पहायला मिळाली.
दोन दिवस पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी मंगळवारी रात्री आठ वाजता पुण्याच्या बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीतून पुस्तकांची खरेदी केली.
संध्याकाळी आठ वाजता राज ठाकरे आपल्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत अक्षरधारा बुक गॅलरीत पोहचले. यावेळी राज ठाकरेंनी बराच वेळ या दुकानात घालवला. पुस्तकालयातला एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागला आहे. ज्यात राज ठाकरे एक-एक पुस्तक निरखून पाहताना दिसत आहेत.
या छोटेखानी भेटीमध्ये राज ठाकरेंनी अक्षरधारा बुक गॅलरीतून मराठी रिसायद, ब्रिटीश रिसायद, शिवाजी सावंत यांची काही पुस्तकं, वा.सी.बेंद्रे यांची काही पुस्तकं, शिवशाही आणि पेशवे घराण्याचा इतिसाह अशी काही पुस्तकं खरेदी केली.









