राज ठाकरेंचा लाडका श्वान ‘जेम्स’चं निधन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातील त्यांचा लाडका कुत्रा जेम्सचं आज निधन झालंय. सोमवारी रात्री १२ वाजता जेम्सचं निधन झाल्याचं कळतंय. राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. ग्रेट डेन प्रजातीचा हा कुत्रा गेली अनेक वर्ष राज ठाकरे यांच्यासोबत घरात रहायचा. राज ठाकरेंचे आपल्या लाडक्या जेम्स सोबतचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातील त्यांचा लाडका कुत्रा जेम्सचं आज निधन झालंय. सोमवारी रात्री १२ वाजता जेम्सचं निधन झाल्याचं कळतंय. राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. ग्रेट डेन प्रजातीचा हा कुत्रा गेली अनेक वर्ष राज ठाकरे यांच्यासोबत घरात रहायचा.
राज ठाकरेंचे आपल्या लाडक्या जेम्स सोबतचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा लाडक्या जेम्सच्या जाण्यामुळे ठाकरे कुटुंबाला धक्का बसल्याचं बोललं जातंय. अनेकदा राज ठाकरे आपल्यासोबत जेम्सला घेऊन जायचे. राज ठाकरेंच्या घरात एकूण तीन ग्रेट डेन प्रजातीचे कुत्रे होते. यापैकी शॉन आणि बाँड यांचं आधीच निधन झालं होतं.