‘राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजप’, मनसे नेत्यांचे ‘वार’

मुंबई तक

राज ठाकरे यांचा गेल्या वर्षीचा अयोध्या दौरा चांगलाच गाजला होता. राज ठाकरे जाणार होते, मात्र तो दौरा झालाच नाही. राज ठाकरेंना भाजप खासदारानेच विरोध केला होता. आता भाजपच्या युपीतील खासदाराला महाराष्ट्र भाजपनंच बळ दिलं होतं, असा स्फोटक दावा मनसेच्याच नेत्यानं केलाय. दुसरीकडे हिंदुत्वावरून राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळेच भाजप विरुद्ध मनसे असं चित्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज ठाकरे यांचा गेल्या वर्षीचा अयोध्या दौरा चांगलाच गाजला होता. राज ठाकरे जाणार होते, मात्र तो दौरा झालाच नाही. राज ठाकरेंना भाजप खासदारानेच विरोध केला होता. आता भाजपच्या युपीतील खासदाराला महाराष्ट्र भाजपनंच बळ दिलं होतं, असा स्फोटक दावा मनसेच्याच नेत्यानं केलाय. दुसरीकडे हिंदुत्वावरून राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळेच भाजप विरुद्ध मनसे असं चित्र निर्माण झालंय.

एकीकडे भाजप-मनसे एकत्र येण्याच्या होत असतानाच मनसेच्या नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केलाय. इतकंच नाही, तर राज ठाकरेंनीही पंतप्रधान मोदींसह भाजपला हिंदुत्वावरून खडे बोल सुनावलेत. एकापाठोपाठ एक आलेल्या विधानांमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. हा मुद्दा बराच गाजला होता. त्यानंतर राज ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलला गेला होता. आता याच मुद्द्यावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी गंभीर आरोप केलाय.

Rohit Pawar महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष; किरण सामंत उपाध्यक्षपदी

हे वाचलं का?

    follow whatsapp