Mns vs ShivSena: ‘आपल्याला ‘धनुष्यबाणा’चा विसर पडल्याबाबत’, MNS नेत्याचं CM ना खरमरीत पत्र

मुंबई तक

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात सुरु असलेल्या धनुर्विद्या प्रशिक्षणा दरम्यान चुकीने एक बाण तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला होता. तेव्हापासून येथील प्रशिक्षण बंद करण्याचे आदेश दिल्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना एक भलं मोठं पत्र लिहून जाब विचारला आहे. पाहा संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे. आपणाला ‘धनुष्य बाणा’चा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात सुरु असलेल्या धनुर्विद्या प्रशिक्षणा दरम्यान चुकीने एक बाण तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला होता. तेव्हापासून येथील प्रशिक्षण बंद करण्याचे आदेश दिल्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना एक भलं मोठं पत्र लिहून जाब विचारला आहे.

पाहा संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.

आपणाला ‘धनुष्य बाणा’चा विसर पडल्याबाबत…

महोदय,

प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत मा. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलीच शिवाय त्याला साजेस पक्ष चिन्हही निर्माण केलं. ते म्हणजे ‘धनुष्यबाण’.. महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हा हिंदू धर्मातलं महत्वाचं प्रतिक आहे. परंतु आपला पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ताभोगात मग्न असल्यापासून हिंदुत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आत्ता आपल्याला धनुष्यबाणाचाही विसर पडलेला दिसतोय हे पाहून वेदना होतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp