शेतकरी हिंसक झाल्यास मोदी सरकार जबाबदार-शरद पवार
आत्तापर्यंत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र यापुढे जर शेतकरी हिंसक झाले तर त्याची सगळी जबाबदारी भाजप सरकारची असेल अशा शब्दात मोदी सरकारवर शरद पवार यांनी टीका केली आहे. 70 दिवसांपासून जास्त काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असंही शरद […]
ADVERTISEMENT
आत्तापर्यंत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र यापुढे जर शेतकरी हिंसक झाले तर त्याची सगळी जबाबदारी भाजप सरकारची असेल अशा शब्दात मोदी सरकारवर शरद पवार यांनी टीका केली आहे. 70 दिवसांपासून जास्त काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ या मुद्द्यांवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. या समस्या कशा वाढतील याकडे मोदी सरकार लक्ष देतं आहे. पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेतलं जातं आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे जनता नाराज आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
आणखी काय म्हणाले शरद पवार?
“आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्येशी काहीही घेणंदेणं नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या सत्तर दिवसांपासून जास्त काळ आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे. आजही आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र या आंदोलनाला जर हिंसक वळण लागलं तर मात्र त्याची संपूर्ण जबाबदारी ही मोदी सरकारची असेल. आजच्या घडीला शेतकऱ्यांना जी वागणूक मिळते आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे नक्कीच धोकादायक चित्र आहे.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विदेशी सेलिब्रिटींच्या ट्विट्सबाबत काय म्हणाले पवार?
भारतातल्या शेतकरी आंदोलनावरुन विदेशातील सेलिब्रिटी अर्थात पॉपस्टार रिहाना, पर्यावरणाची अभ्यासक ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांनी ट्विट केलं आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “आपल्या देशातल्या शेतकऱ्यांची समस्या आंतरराष्ट्रीय झाली आहे, याबाबत बाहेरच्या कुणी भाष्य करणाऱ्यांचं समर्थन नाही. असं असलं तरी हे खरं आहे की देशातलं सरकार शांत राहिलं. त्यामुळेच ही समस्या देशाबाहेर गेली जे योग्य नाही.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT