Mohan Bhagwat भेट, गाय राष्ट्रीय प्राणी, ओम-अल्लाह एक : अर्शद मदनी अन् वाद…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jamiat Ulema-e-Hind : one of the biggest organizations of the Muslim community

मौलाना अर्शद मदनी. जमियत उलेमा-ए-हिंद (Jamiat Ulema-e-Hind) या मुस्लीम समाजाच्या सर्वात मोठ्या संघटनेच्या एका गटाचे प्रमुख आणि मुस्लीम समाजातील (Muslim Community) सर्वात चर्चित नेते. नुकतंच या संघटनेच्या दुसऱ्या गटाचे प्रमुख महमूद मदनी यांनी देशात सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी दिल्लीत एक अधिवेशन आयोजित केलं होतं. याच अधिवेशनात बोलताना मौलाना अर्शद मदनी (Maulana Arshad Madani) यांनी ‘ओम आणि अल्लाह’ एकच असल्याचं आणि पैगंबर आदम हे दोन्ही धर्मीयांचे पूर्वज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मौलाना इथवरचं थांबले नाहीत. ते म्हणाले, जेव्हा पृथ्वीवर कोणीही नव्हतं तेव्हा मनूने कोणाची पूजा केली? मौलाना यांच्या या विधानाला तिथं उपस्थित असलेल्या इतर अनेक धर्मगुरूंनी विरोध केला. (Maulana arshad madani and controversy on Mohan Bhagwat Meet, Cow National Animal, Om-Allah Ek)

मौलाना अर्शद मदनी काय म्हणाले होते?

ते म्हणाले होते, “मी मोठ्या धर्मगुरुंना विचारलं, जेव्हा श्रीराम, ब्रह्मा, शिवा असं कोणीही नव्हतं, तेव्हा मनूने कोणाची पूजा केली? ते म्हणाले, काही लोकं म्हणतात की ते शिवाची पूजा करायचे, परंतु त्यांनाही नेमकं माहित नाही. काही लोकं सांगतात, जेव्हा जगात कोणीही नव्हते तेव्हा मनू ओमची पूजा केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मदनी सांगतात, ‘मग मी विचारलं ‘ओम’ कोण आहे? बरीच लोकं म्हणाले की ही ‘हवा’ आहे. या हवेचं कोणतंही रूप नाही, रंग नाही. ती जगात सर्वत्र आहे, त्यानेच आकाशाची निर्मिती केली, जमीनीची निर्मिती केली. मदनी सांगतात, ‘मी म्हणालो, अरे बाबा, आम्ही त्याला ‘अल्ला’ म्हणतो. तुम्ही त्याला ‘देव’ म्हणा. पर्शियन भाषिक ‘खुदा’ आणि इंग्रजी भाषिक ‘गॉड’ म्हणतात.

Maharashtra Crisis: ठाकरेंना दिलासा की धक्का? कोर्टातील सुनावणी Live

ADVERTISEMENT

याचा अर्थ मनु म्हणजेच आदम, ओम म्हणजेच अल्लाहची पूजा करत असे. ही आपल्या देशाची ताकद आहे. त्यामुळे इस्लाम भारतासाठी नवीन धर्म नाही. ‘अल्लाह’ म्हणजेच ‘ओम’ने मनू म्हणजेच आदमला खाली पाठवलं, त्याला एका ‘अल्लाह’ची म्हणजेच ‘ओम’ची उपासना करण्यास सांगितलं आणि त्यानंतर आलेल्या पैगंबरांनीही तोच संदेश दिला, असा दावा मौलाना यांनी केला. मौलाना अर्शद मदनी यांच्या वक्तव्यावर जैन मुनी लोकेश मुनी यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. काही मुनी कार्यक्रम सोडून निघूनही गेले.

ADVERTISEMENT

यापूर्वी झालेले वाद :

गायीला राष्ट्रीय प्राणी मानण्याची मागणी :

देशात गायीवरून सुरू असलेले राजकारण आणि हिंसाचार रोखण्यासाठी मौलाना अर्शद मदनी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, देशातील एका मोठ्या वर्गाच्या भावना गायीशी जोडलेल्या आहेत. गोहत्येमुळे वातावरण बिघडतं. गोहत्येमुळेच देशात अनेक हत्या झाल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावं. यामुळे गाय आणि मानव दोघांचेही रक्षण होईल. यासोबतच त्यांनी सरकारकडे गाईच्या रक्षणासाठी कायदा करावा अशीही मागणी केली होती.

मौलाना मदनी – मोहन भागवत भेट :

मौलाना अर्शद मदनी यांची राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याशी झालेली भेट चर्चेच्या केंद्रस्थानी होती. ऑगस्ट 2019 मध्ये, अयोध्या खटल्याचा निकाल येण्यापूर्वी मदनी यांनी केशव कुंज या संघाच्या दिल्ली कार्यालयात भागवत यांची भेट घेतली होती. यादरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली, परंतु संघ किंवा मौलाना अर्शद मदनी यांनी या बैठकीत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला नव्हता. पण मौलाना मदनी सर्वोच्च न्यायालयात अयोद्धा खटल्यात बाबरी मशिदीसाठी पक्षकार होते.

Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे पंडितांनी बनवल्या, सरसंघचालकांचं विधान

तबलीगी जमातच्या समर्थनार्थ पुढे आले होते मौलाना :

कोरोना काळात सरकारने तबलीगी जमातीविरोधात काही कडक पावलं उचलली होती. जमातचा मरकज सील करण्यात आला होता. इथल्या लोकांनाही नजरकैदेत ठेवलं होतं. तेव्हा मौलाना अर्शद मदनी यांनी तबलगी जमातीची बाजू घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर निजामुद्दीनमध्ये लॉकडाऊनचं पूर्णपणे पालन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यात मरकजचा कोणताही दोष नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.

मौलाना असद मदनी यांच्या मृत्यूनंतर जमियत उलेमा-ए-हिंद ही संघटना दोन गटात विभागली गेले आहे. यामध्ये एका गटाची धुरा मौलाना अर्शद मदनी यांच्या हातात असून दुसऱ्या गटाची कमान त्यांचा पुतण्या महमूद मदनी यांच्या हाती आहे. ही मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना आहे आणि मुस्लिमांशी संबंधित सर्व गोष्टींबाबत ही संघटना सक्रिय असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT