Molnupiravir Corona Medicine: 35 रुपयांची कॅप्सूल, 5 दिवसांचा कोर्स; कोरोना बरा करण्याऱ्या गोळीबद्दल सगळी माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना व्हायरसविरोधात एक नवीन औषध भारतात आले आहे. काही दिवसांपूर्वी, ड्रग्स कंट्रोलरने अँटी-व्हायरल औषध Molnupiravir च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. या औषधाचा वापर कोरोनाच्या उपचारात केला जाणार आहे. भारतातील 13 कंपन्या हे औषध बनवत आहेत.

Molnupiravir हे औषध कोरोनाच्या उपचारात खूप प्रभावी ठरले आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होईल. या औषधाचा एकच डोस 200mg असेल. त्याचा कोर्स ५ दिवसांचा असणार आहे.

या औषधाची किती असेल किंमत?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

– हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हीटेरो आणि ऑप्टिमससारख्या 13 कंपन्या बनवत आहेत. या सर्व कंपन्या त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या नावाने ते लॉन्च करत आहेत.

– हैदराबादस्थित डॉ. रेड्डीजने ‘Molflu’ या नावाने हे औषध बाजारात आणले आहे. याच्या एका कॅप्सूलची किंमत 35 रुपये ठेवण्यात आली आहे. बाधित रुग्णाला 24 तासांच्या आत 8 गोळ्या घ्याव्या लागतील. म्हणजेच 5 दिवसात 40 गोळ्या. या औषधाच्या 40 कॅप्सूलची किंमत 1,400 रुपये असेल.

ADVERTISEMENT

हे औषध कोणीही घेऊ शकतं का?

ADVERTISEMENT

– नाही… वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध घेणे धोकादायक ठरू शकते. याशिवाय, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा तसेच गर्भवती महिलांनी देखील हे औषध घेऊ नये.

– कोरोनाच्या ज्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे असतील त्यांना हे औषध दिले जाईल. सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्यांना हे औषध न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे औषध कुठे विकत घेऊ शकतो?

– हे औषध देशभरातील फार्मसीच्या दुकानात उपलब्ध असेल. डॉ. रेड्डीज व्यतिरिक्त इतर कंपन्या देखील Molnupiravir हे औषध उपलब्ध करुन देत आहे. ही सर्व औषधे बाजारात उपलब्ध असतील. जी वैद्यकीय सल्ल्याने घेता येतील.

-पुढील आठवड्यापासून देशभरातील फार्मसी दुकानांमध्ये Molflu चे औषध विक्रीसाठी उपलब्ध असेल, असे निवेदन डॉ. रेड्डीज यांनी जारी केले आहे. तथापि, ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या राज्यांमध्ये हे औषध जास्त प्रमाणात पुरवलं जाणार आहे.

Omicron संकटादरम्यान भारतात दोन नव्या लसींना मंजुरी, कोणत्या आहेत नव्या लसी?

हे औषध कोणी बनवले?

– हे औषध अमेरिकन फार्मा कंपनी Merck’s ने बनवले आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नुकतेच हे औषध कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. आता या औषधाला भारतातही परवानगी मिळाली असून ते भारतातही बनवले जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT