दिसलं कुत्र्याचं पिल्लू की फेक झाडावरून खाली! बीडमधल्या गावात वानरांची जबरदस्त दहशत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

बीडमधल्या माजलगाव तालुक्यातलं लवुळगाव हे सध्या माकडं, वानरं यांची जबरदस्त दहशत पाहण्यास मिळते आहे. कारण या गावात कुत्रे आणि माकडं यांच्यात जणू खुन्नस निर्माण झाली आहे असं चित्र आहे. एका कुत्र्याने वानराचं पिल्लू मारलं. तेव्हापासून वानर आणि कुत्र्यांमध्ये चक्क दुश्मनी पाहण्यास मिळते आहे. कुत्र्याचं पिल्लू दिसलं रे दिसलं की वानरं ती पिल्लं झाडावर नेतात आणि उंचावरून खाली फेकून देतात.

हे वाचलं का?

कुत्रेही माकडांवर सातत्याने धावून जात आहेत. तर माकडं आणि वानरं ही कुत्र्यांच्या जिवावर उठली आहेत. कुत्रे आणि माकडं यांच्यातल्या भांडणामुळे गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.

माजलगाव तालुक्यातील लवूळ भागात माकडं आलेली आहेत . परंतू काही दिवसांपासून विचित्र प्रकार पहायला मिळत आहे . सध्या गावात कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे . माकडांची टोळीच्या टोळी येते आणि कुत्र्यांवर हल्ले करते.माकडांना घाबरुन जो तो जीव मुठीत धरुन पळत आहे .

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

माकडांच्या दहशतीमुळे लहान पोरं-सोरं माकडांपासून वाचण्यासाठी सैरावैरा धावत आहेत . अख्खं गाव कुत्रे आणि माकडांच्या दहशतीखाली आहे . ग्रामस्थांनी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट धारुर येथील वन विभागाशी संपर्क साधला आहे . मात्र वन विभागाने अद्यापही ठोस पावलं उचलली नाहीत . माकडं येतात आणि कुत्र्यांची पिल्लं शोधतात . पिल्लू दिसलं रे दिसलं की त्या पिल्लाला उंचावर नेतात आणि तिथून फेकून देतात . आजपर्यंत कुत्र्याच्या अनेक पिल्लांवर माकडांनी हल्ले केले आहेत . काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी माकडाच्या पिल्लावर हल्ला केला होता . त्या घटनेनंतर या गावात रोज माकडं येतात आणि कुत्र्यांच्या पिल्लांवर हल्ले करतात अशी चर्चा गावात होते आहे .

जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला या वानरांनी पुरते बेजार करून टाकलं आहे.रस्त्यावरून चालणाऱ्या माणसावर सुद्धा या वानरांनी हल्ले केलेत त्यामुळे लोक आता रस्त्याने चालताना सुद्धा मागे पुढे बघत असतात लहान मुलांना तर एकटे घराबाहेर लोक सोडत नाहीत रात्रीचं सोडा दिवसासुद्धा बाहेर फिरताना लोकांमध्ये या वानरांची दहशत पाहायला मिळते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT