Mood Of The Nation : कोण आहे देशातला सर्वात लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री?
इंडिया टु़डेने देशभरात केलेल्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेमध्ये एंटरटेंनमेंट इंडस्ट्रीचा सुध्दा समावेश आहे. 2021 साली एंटरटेंनमेंट इंडस्ट्रीच्या सर्व्हेमध्ये बॉलिवूड आणि वेगाने पसरत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत. वयाच्या चाळीशीत पोहचलेल्या अभिनेत्री सिनेमा आणि ओटीटी या दोन्हीमध्ये नंबर एकला आहेत. तर बच्चन पिता पुत्र […]
ADVERTISEMENT
इंडिया टु़डेने देशभरात केलेल्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेमध्ये एंटरटेंनमेंट इंडस्ट्रीचा सुध्दा समावेश आहे. 2021 साली एंटरटेंनमेंट इंडस्ट्रीच्या सर्व्हेमध्ये बॉलिवूड आणि वेगाने पसरत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
या सर्व्हेमध्ये अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत. वयाच्या चाळीशीत पोहचलेल्या अभिनेत्री सिनेमा आणि ओटीटी या दोन्हीमध्ये नंबर एकला आहेत. तर बच्चन पिता पुत्र सिनेमा आणि ओटीटी माध्यमात सध्या नंबर वन असून आपणच शहेनशहा असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
हे वाचलं का?
या सर्व्हेमध्ये विचारलेला पहिला प्रश्न होता की
तुमच्या मते भारतातला सिनेमातील कोण अभिनेता नंबर वन आहे…
ADVERTISEMENT
यात लोकांनी सर्वात जास्त मतं दिली आहेत सुपरस्टार अमिताभ बच्चन ह्यांना.
ADVERTISEMENT
त्यांना ३०.६ टक्के लोकांनी मतं दिलं आहे. ७९ वर्षीय अमिताभ बच्चन यांचा चेहरे हा सिनेमा आँक्टोबरमध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा इतका लोकांनी पसंत केला नसला. तरी दररोज टीव्हीवर कौन बनेगा करोडपतीमध्ये होणारं त्यांचं दर्शन आणि सामान्य लोकांसोबत होणारा त्यांचा संवाद यामुळे ते भारतभर लोकप्रिय आहेत.
यात दुसऱ्या नंबरवर अक्षय कुमारने बाजी मारली आहे. सूर्यवंशी या अक्षय कुमारच्या गाजलेल्या सिनेमामुळे त्याला १२ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. तर तिसऱ्या नंबरवर आहे भाईजान अर्थात सलमान खान .. सलमानला ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सलमानच्या अंतिम सिनेमामुळे आणि बिग बॉसच्या अँकरिंगमुळे त्याला ही मतं मिळाली आहेत.
यात शाहरूख खानला चौथा नंबर मिळाला असून त्याला ५.२ टक्के लोकांनी मतं दिली आहेत. तर पाचव्या क्रमांकावर सुपरस्टार रजनीकांत आहेत त्यांना ३.९ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे,
या सर्व्हेमध्ये विचारलेला दुसरा प्रश्न होता की
तुमच्या मते भारतातला सिनेमातील कोणती अभिनेत्री नंबर वन आहे…
यात नुकतीच विवाहीत झालेली अभिनेत्री कतरिना कैफने बाजी मारली आहे. तिला ७.२ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. अभिनेता विकी कौशलसोबत कतरिनाचं झालेलं लग्न आणि सूर्यवंशी सिनेमातील टीप टीप बरसा पानी या गाण्यावरचं तिचा डान्स यावर्षी प्रचंड चर्चेत होता.
या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे अभिनेत्री दिपीका पदुकोण तिला ६.८ टक्के लोकांनी आपली पसंती दाखवली आहे. तर तिसऱ्या नंबरवर आहे अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिला ६.३ टक्के लोकांनी आपली पसंती दाखवली आहे. तर आपल्या बिनधास्त स्टेंटमेंटमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणौतला ४.९ टक्के लोकांनी आपलं मत दिलं आहे तर अभिनेत्री करिना कपूर खानला पाचव्या क्रमांकावर ३.६ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.
या सर्व्हेमध्ये विचारलेला तिसरा प्रश्न होता की
तुमच्या मते भारतातील ओटीटी प्लँटफॉर्मवरील कोणता अभिनेता नंबर वन आहे…
सिनेमाच्या कँटगरीमध्ये बिग बींनी बाजी मारलेली असताना. ज्युनियर बच्चनने ओटीटीमध्ये नंबर वनवर आपलं नाव कोरलं आहे. बॉब बिस्वासमधल्या भूमिकेमुळे १२.५ टक्के लोकांनी अभिषेक बच्चनला आपलं मत दिलं आहे.
यानंतर द फँमिली मँनमधील भूमिकेमुळे अभिनेता मनोज वाजपेयी दुसऱ्या नंबरवर आहे त्याला ९.८ टक्के मतं मिळाली आहेत.
तर आश्रममधील बाबाच्या कँरेक्टरमुळे अभिनेता बॉबी देओलला ७.१ टक्के लोकांनी मतं देऊन तिसरा नंबर दिला आहे.
तांडवमधल्या अप्रतिम अदाकारीमुळे अभिनेता सैफ अली खान या लिस्टमध्ये ४ थ्या नंबरवर आहे त्याला ४.७ टक्के लोकांनी आपलं मत दिली आहे. तर सिरीयस मँनमधील भूमिकेमुळे पाचव्या नंबरवर असलेल्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीमुळे ३.७ टक्के लोकांनी आपलं पसंतीचं मत दिलं आहे.
या सर्व्हेमध्ये विचारलेला चौथा प्रश्न होता की
तुमच्या मते भारतातील ओटीटी प्लँटफॉर्मवरील कोणती अभिनेत्री नंबर वन आहे…
आरण्यक वेबसिरीजमुळे ओटीटीवर डेब्यू करणारी अभिनेत्री रविना टंडनला लोकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. तिला तब्बल १६ टक्के लोकांनी मत दिलं आहे. तर दुसरा क्रमांक पटकावला आहे. आर्या वेबसिरीजमधील आपल्या भूमिकेमुळे अभिनेत्री सुश्मिता सेनने तिला १२.२ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री राधिका आपटे तिच्या अनेक चांगल्या भूमिका प्रक्षकांच्या पसंतीस पडल्या असून तिला २.७ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.
चौथ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री पूजा भट्ट तिच्या बॉम्बे बेगमसमधील हटके भूमिकेमुळे तिला २.५ टक्के लोकांनी आपल्या पसंतीचं मत दिलं आहे. तर पाचव्या क्रमांकावर आहे अभिनेत्री हुमा कुरेशी. तिच्या महाराणी या वेबसिरीजमधील अभिनयामुळे तिला १.८ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT