पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर पाठोपाठ पुणे शहराला बसलेला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा विळखा हा देखील स्थानिक प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने सक्रीय रुग्णसंख्येचा आकडा वाढताना दिसत आहे. आज दिवसाअखेरीस पुण्यात १ हजार ६३३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून मृतांपैकी एक व्यक्ती हा पुण्याबाहेरचा आहे.

सध्याच्या घडीला पुण्यात कोरोनाग्रस्त सक्रीय रुग्णांची संख्या ही २ लाखाच्या वर गेलेली आहे. ३५१ रुग्णांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने होणारी रुग्णवाढ पाहता…शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार आणि विभागीय आयुक्तांच्या बैठकीत सध्यातरी पुण्यात लॉकडाउन लागू करण्यात येणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं.

परंतू वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपूर : शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढताच, ७ जणांचा मृत्यू

पाहा पुण्यात काय सुरु, काय बंद

ADVERTISEMENT

 • रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

ADVERTISEMENT

 • 31 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद

 • हॉटेल आणि बार रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद

 • पार्सल सेवा रात्री 11 नंतर

 • मॉल्स, सिनेमागृह रात्री 10 नंतर बंद

 • लग्न समारंभास 50 लोकांनाच परवानगी

 • सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध

 • बाग-बगीचे संध्याकाळी बंद

 • लायब्ररी 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

  • follow whatsapp

   ADVERTISEMENT