महाराष्ट्रात Corona चा कहर सुरुच, दिवसभरात ४९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. कारण दिवसभरात राज्यात ४९ हजार ४४७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात ३७ हजार ८२१ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८४.४९ टक्के इतका झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीये. कारण दिवसभरात राज्यात ४९ हजार ४४७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात ३७ हजार ८२१ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८४.४९ टक्के इतका झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला हा रिकव्हरी रेट ९२ टक्के आणि त्याच्याही वर होता. राज्यात २७७ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. राज्याचा मृत्यू दर १.८८ टक्के इतका झाला आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने बेड मिळवण्यासाठी वणवण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३ लाख ४३ हजार १२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९ लाख ५३ हजार ५२३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ५७ हजार १३५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर १८ हजार ९१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ४ लाख १ हजार १७२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ४९ हजार ४४७ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात आज नोंद झालेल्या २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर ६७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७८ मृत्यू पुणे २२, औरंगाबाद २१, नागपूर १६, ठाणे ६, यवतमाळ ५, नाशिक २, अकोला १, बुलढाणा १, हिंगोली १, लातूर १, नांदेड १ आणि सोलापूर १ असे आहेत.

नागपुरात कोरोना मृत्यूचा उच्चांक, गेल्या 24 तासात किती जणांना गमावले कोरोनामुळे प्राण?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई-६० हजार ८४६

ठाणे- ४८ हजार ६६०

पुणे- ७३ हजार ५१९

नाशिक-३१ हजार ५१२

अहमदनगर- १२ हजार ८८१

जळगाव- ७ हजार ६४१

औरंगाबाद-१४ हजार ३०२

लातूर- ६ हजार ९७१

नांदेड-१० हजार ७०२

नागपूर-५२ हजार ४०८

हे वाचलं का?

    follow whatsapp