अभिनेत्री मौनी रॉयचं ठरलं! जानेवारीमध्ये चढणार बोहल्यावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बोहल्यावर चढणार आहे. मौनी रॉयचं लग्न ठरलं असून, तिचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकार यानेच ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सुरज नांबियारसोबत संसार थाटणार आहे. मौनी आणि सुरज रिलेशनमध्ये आहेत. मौनी रॉय सुरजला डेट करत असल्याची चर्चाही होती. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री मौनी रॉयच्या आईने काही दिवसांपूर्वी मौनीचा बॉयफ्रेंड सुरज नांबियारची भेट घेतली. अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी मौनीची आई सुरजला भेटल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

मौनी व सुरज विवाह करणार असून, मौनीचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकारने याबाबत माहिती दिलीये. पश्चिम बंगालमधील कूच बेहारमधील एका स्थानिक वर्तमानपत्राला विद्युत रॉयसरकारने मौनीच्या लग्नाबद्दल माहिती दिली.

अभिनेत्री मौनी रॉय सुरज नांबियारसोबत जानेवारी २०२२मध्ये लग्न करणार आहे. मौनी रॉयचं लग्न दुबई किंवा इटलीमध्ये होईल. त्यानंतर कूच बेहारमध्येही लग्नाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मी कुटुंबासह मौनीच्या लग्नाला हजर राहणार असल्याचंही विद्युत रॉयसरकारने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

छोट्या पडद्यावर गाजलेल्या नागिन मालिकेमुळे मौनी रॉय घराघरात पोहचली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांनी आवडली होती. अलिकडेच मौनी झी ५ वर प्रदर्शित झालेल्या लंडन कॉन्फिडेन्शिअलमध्ये झळकली होती. सप्टेंबर २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

ADVERTISEMENT

आगामी बहुचर्चित ब्रह्मास्त्र सिनेमात मौनी रॉयनं भूमिका साकारलेली आहे. अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सुरज नांबियार कोण आहे?

मौनी रॉयचा बॉयफ्रेंड सुरज नांबियार पेशाने बँकर आणि व्यावसायिक आहे. तो सध्या दुबईत असतो. सुरज नांबियार मूळचा बंगळुरूचा आहे. तो जैन कुटुंबातून येतो. तर मौनी रॉयचं बालपण कूच बेहारमध्ये गेलं आहे. मौनी रॉयचे वडील कूच बेहार नगरपालिकेत अधीक्षक होते, तर तिची आई शिक्षिका होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT